शेवग्याच्या पानांचे कटलेट (shevgyachya panache cutlet recipe in marathi)

#कटलेट#सप्टेंबर
रेसिपी शेवग्याच्या पानांची कटलेट का? तर या पानांमध्ये विपुल पोषणमूल्यं असतात. शेवग्याची पाने बाजारात सर्रास विकत मिळत नाही, टिक्की किंवा वडी,कटलेट करायचे असतील तर डायरेक्ट पाने झाडावरूनच तोडावी लागतात.
पानांमधल्या पोषणमूल्यांचा विचार करता शेवग्याच्या पानात इतर कोणत्याही हिरव्या पालेभाजीपेक्षा पोषणमूल्ये जास्त प्रमाणात आढळतात.कॅल्शियम गोळ्या न खाता शेवगा सेवन करा .महिलांनी त्यांचे सुगरणीचे गूण उपयोगात आणून शेवग्याचे पदार्थ तयार करून मुलांना द्यावे तसेच त्याचे सूप तयार करून द्यावे.आठवड्यातून किमान ३ ते ४ वेळा शेवगा आहारातून घेतला गेला पाहिजे. शेवग्याची शेंगभाजी,शेवग्याची चटणी, शेवगा सूप,
निसर्ग उपचारात शेवग्याचे फार मोठे महत्व आहे.

कुकिंग सूचना
- 1
शेवग्याची पाने स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.
- 2
चिरलेल्या पानांमध्ये कांदा, कोथिंबीर,मिरची, बेसन पीठ, नाचणीचे पीठ, हळद, सैंधव मीठ, जिरेपूड, धणेपूड,आलेलसूण पेस्ट, बारीक चिरलेला कडीपत्ता मिसळून घ्या.थोड्यावेळ बाजूला ठेवा. कांद्यामूळे थोडं पाणी सुटत मिश्रणाला म्हणून जास्त पाणी घालू नका.
- 3
थोडस पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्या. त्याचे छोटे छोटे कटलेट बनवा. तांदळाचे पीठ लावून तेलावर सोडा. दोन्ही बाजूने व्यवस्थित शालोफ्राय करा.
- 4
चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करा. नुसतेच खायला सुद्धा छान लागतात. हे कटलेट गरम अथवा थंड दोन्ही प्रकारे चविष्ट लागतात.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)