खान्देशी चवीची झणझणीत मिक्स उसळ (mix usal recipe in marathi)

#रेसिपीबुक #week 5
रेसिपी नं 21
झणझणीत_मिक्स_कडधान्याची_रस्सा_उसळ
खांन्देशी_चवीची_मिक्स_उसळ
महाराष्ट्रीयन_जेवण_म्हटलं_की उसळ_ही_आलीच 😍😍
घराघरात बनवली जाणारी वरण भाता सोबत नेहमीच ताटात असणारी अगदी कधी नाश्त्याला तर कधी हळद मीठ टाकून शिजवलेली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी उसळ जी खायला चविष्ट आणि हेल्दी 😋😋माझ्या आई कडे गुरूवारी उपवास असतो आम्ही लहान असताना आमचा ठरलेला बेत मस्त गरमागरम वरणभात, मटकी उसळ, चपाती, अळु वडी, लोणचं, पापड असा साग्रसंगीत जेवणाचा बेत असायचा 😘😘आणि मला ही खुप आवडायचा 😋म्हणुन आठवणींना उजाळा देत
आज मुद्दाम मिक्स उसळ रस्सा बनवला😊😊 नाही म्हटलं तरी बर्याच ठिकाणी लाॅकडाऊन मुळे भाजी चा प्रश्न आहे त्यासाठी हा बेत झकास आहे आणि हेल्दी सुद्धा ☺️सोबत पावसाळी वातावरण ☔ घरात मस्त झणझणीत मिक्स उसळ चा बेत आ... हा... हा

कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम 5 ते 6 तास मिक्स कडधान्य पाण्यात भिजवून घ्या. छान उमळले की स्वच्छ धुवून घ्या व कढईत तेल गरम करून त्यात जीरे हिंग हळद ची फोडणी करून त्यात उमळलेली उसळ घाला आणि छान शिजवुन घ्या कुकर मधे 1 शिट्टी काढुन घेऊ शकता.
- 2
आता रस्सा उसळ साठी मसाला तयार करून घ्या. खोबर, कांदा,लसुण,आल, छान तव्यावर खमंग भाजून घ्या व पाणी घालून मिक्सर मधून बारीक वाटून घ्या
- 3
आता कढईत तेल गरम करून त्यात तमालपत्र, कढीपत्ता छान परतुन घ्या व मिक्सर मधून बारीक वाटून घेतलेला मसाला घाला आणि छान परतून घ्या.
- 4
वाटलेला मसाला छान फ्राय झाला की त्यात लाल तिखट, काळा मसाला /गरम मसाला घालुन तेल सुटेपर्यंत परतुन घ्या.मसाला छान शिजला की त्यात भिजवलेले शेंगदाणे शिजवलेली उसळ घाला आणि छान एकजीव करून घ्या.
- 5
आता तुमच्या आवडीनुसार पाणी घाला आणि रस्सा तयार करून घ्या चवीनुसार मीठ घाला आणि मस्त एक 2 ते 3 मिनिटे छान उकळी काढून घ्या.
- 6
तयार आहे मस्त झणझणीत गरमागरम मिक्स कडधान्याची रस्सा उसळ
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या