गरमागरम चाॅकलेट मसाला दुध (chocolate masala milk recipe in marathi)

#रेसिपीबुक
#दुध
रेसिपी नं 27
गरमागरम या करता बोलले कारण आता मस्त श्रावण सरी चालु आहेत हवेत खुप असा गारवा आहे. मग अगदीच गरमागरम दुध प्यायची इच्छा होते. लाॅकडाऊन च्या आधी जेवणानंतर शतपावली करायला जायचो तेव्हा मस्त चौकात गरमागरम दुध प्यायला मिळायच पण कोरोना मुळे बाहेर चा तर विषयच नको मग मी आणि हबी आम्ही दिवसभर पाॅझिटीव्ह पेशंट मध्ये असतो पण रात्री सगळे रिपोर्ट आले की एकमेकांसाठी वेळ देतो तेव्हा मस्त गॅलरीत बसुन गप्पा मारत दिवसभराचा शिन विसरतो.मला कोरोना च्या या टाईट शेड्युल मध्ये एक ती वेळ खुप काही देवुन जाते.व मन आणि मेंदू दोन्ही शांत होतात आणि छान झोप येते.म्हणुन रेसिपी पोस्ट करते खुप काही नाही साधी सोपी रेसिपी.

कुकिंग सूचना
- 1
वरील सर्व साहित्य एकत्र करून मी घरी दुध मसाला बनवलेला आहे तोच वापरते तो खिर किंवा गोडाच्या कोणत्याही पदार्थात वापरता येतो
- 2
सर्वात प्रथम एका भांड्यात दुध गरम करायला घ्या.दुधाला छान उकळी काढुन घ्या.
- 3
दुध उकळले की त्यात वरील सर्व साहित्य बारीक करून मसाला बनवलेला आहे तो घाला.
- 4
मस्त दुध उकळले की तयार मसाला दुध वरून बदामाचे काप घालून सर्व्ह करा.
- 5
त्यातच ग्लास मध्ये चाॅकलेट साॅस टाका व आवडीनुसार दुधात चाॅकलेट घाला तयार आहे गरमागरम चाॅकलेट मसाला दुध
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या