केशर युक्त नारळीभात (kesar naral bhaat recipe in marathi)

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
Kalyan

#रेसिपीबुक
#week8
#नारळीपौर्णिमारेसिपीज्
बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याचा हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते. या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम, पराक्रम, सय्यम आणि साहस. निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा-बहिणीचं नातं. पूर्वजांनी भारतीय संस्कृती मध्ये या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायला आहे. आपल्या भारत देशाने संस्कृतीचे उत्तम उदाहरण देऊन मानवाला योग्य दिशा प्रदान केली आहे.

"राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे. कुठल्याही कर्तबगार, धाडसी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. हे अभय शास्त्राधारे पौरोहित्य करणारे पुरोहित आपल्या यजमानघरी स्वतः सर्वांना राखीचा रेशीमधागा मंत्रोच्चारांसह बांधून देतात. यातला गर्भित अर्थ नात्याचे रक्षण करणे हाच आहे. याच दिवशी नारळी पौर्णिमा साजरी केली जाते.
नारळी पौर्णिमेच्या दिवशी घराघरात नारळापासून बनणाऱ्या वेगवेगळे पदार्थ नारळाच्या वड्या, नारळीभात असे विविध पदार्थ केले जातात. आज असाच CKP पारंपरिक पद्धतीने तयार केलेला नारळी भात कमी वेळात पटकन कसा करता येईल ते आपण पाहूया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४० मिनिटे
४ व्यक्तींसाठी
  1. 2 टेबलस्पूनतूप
  2. 1 कपबासमती तांदूळ
  3. 12 ते 15 काजू
  4. 4लवंगा
  5. 4वेलची
  6. 2 कपनारळाचे घट्ट दूध
  7. चिमुटभरमीठ
  8. 1/2 कपगूळ
  9. 1/2 कपखवणलेला खोबरं
  10. 1 टेबल स्पूनवेलची पूड
  11. ८/१० केशर काड्या

कुकिंग सूचना

४० मिनिटे
  1. 1

    पॅन गरम करा. त्यामध्ये तूप घाला. तूप तापले की त्याच्यामध्ये लवंगा व वेलची घाला. आता त्यामध्ये काजू,बेदाणे घालून परतून घ्या. आता तांदूळ ह्यामध्ये घाला व तांदूळ परतून घ्या

  2. 2

    तांदूळ परतल्यानंतर आता त्यात नारळाचे दूध घाला. व्यवस्थित ढवळून घ्या व मिठ पण घाला.आता झाकण ठेवा आणि मध्यम आचेवर नारळाचे दूध शोषले जाईपर्यंत 80 टक्के भात शिजवून घ्या.

  3. 3

    आता त्यामध्ये केशर काड्या घालून घ्या. नारळाचे दूध थोडे आटेपर्यंत वाफ आली की आता त्यामध्ये गूळ घाला

  4. 4

    गूळ हळूहळू विरघळला की आता त्यामध्ये वेलची पावडर घाला. थोडे बेदाणे व काजू घालून ढवळून घ्या.

  5. 5

    गूळ व्यवस्थित विरघळला पाहिजे, एक सारखा पसरवून घ्या, मंद आचेवर दहा ते पंधरा मिनिटे वाफ काढून घ्या. नारळाचे दूध पूर्ण शोषले गेले की गॅस बंद करा.

  6. 6

    नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन या दिवशी आपल्या बंधुराया साठी खास तयार आहे केशरयुक्त नारळी भात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes