नारळी पौर्णिमा विशेष.... नारळी भात

#रेसिपीबुक
#week 8
रेसिपी नं 28
रक्षाबंधन विशेष पोस्ट नं 1
श्रावण पौर्णिमेला कोळी बांधव नारळी पौर्णिमा असे म्हणतात. समुद्र हे वरूण देवाचे स्थान समजले जाते. वरूणदेव हा पश्चिम दिशेचा रक्षक आहे त्याला या नारळीपौर्णिमेच्या दिवशी नारळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.
कोळीबांधवांचे संपुर्ण जीवन सागराशी एकरूप झालेले असते. त्यामुळे सागराची आपल्यावर कायम कृपा राहावी याकरीता त्याची प्रार्थना करून त्याचे उतराई होण्याच्या हेतुने नारळीपौर्णिमेचा हा उत्सव मोठया उल्हासाने कोळी बांधव साजरा करतांना दिसतात.
नारळीपौर्णिमेच्या बऱ्याच अगोदर कोळी बांधवांनी समुद्रात जाणे थांबवले असते. एकतर तो काळ माश्यांच्या प्रजननाचा काळ समजला जातो आणि दुसरे म्हणजे पावसाळा असल्याने समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे कोळी बांधव त्या दरम्यान समुद्रात जात नाहीत.कोळी बांधव आपापल्या बोटी रंगरंगोटी करून सजवितात. बोटींना पताका लावुन सुशोभित केल्या जाते. बोटींची पुजा करून त्यांना मासेमारीकरता समुद्रात लोटतात.
नारळी पौर्णिमेच्या निमीत्ताने बनवलेल्या खास नारळाच्याकरंजा,नारळाच्या वड्या महत्त्वाचे म्हणजे नारळी भाताचा नैवेद्य सागराला आणि बोटीला दाखवण्यात येतो आमच्या घरी सर्वांना फार आवडतो म्हणून नारळी भात हमखास होतो. चला तर माझी रेसिपी तुम्हालाही शेअर करते.

कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम एका भांड्यात भात शिजवुन घ्या. त्यासाठी कढईत साजुक तुप घाला त्यात लवंग मीरे दालचिनी घालून छान फ्राय करून घ्या व त्यात भिजवलेला तांदूळ घाला.
- 2
तांदूळ छान परतुघ्या.व आवश्यकते नुसार पाणी घाला चवीनुसार मीठ घाला आणि झाकन ठेवुन 80 % भात छान शिजवुन घ्या.
- 3
शिजलेला भात एका ताटात काढुन घ्या. आणि गार होऊ द्या.
- 4
आता नारळ फोडुन छान खोवुन घ्या किंवा मिक्सर मधून बारीक केल तरी चालेल
- 5
आता गॅस वर पॅन ठेवुन त्यात साजुक तुप घाला आवडीनुसार काजु फ्राय करून घ्या आणि त्याच पॅन मध्ये शिजवलेला भात घाला परतुन घ्या आणि त्यात खोवलेल खोबर घाला 3 ते 4 मिनिटे छान परतून घ्या.
- 6
आता त्यात साखर घाला व मस्त फ्राय करून घ्या. छान सगळे पदार्थ एकजीव करून घ्या.
- 7
आवडीनुसार सुकामेवा घाला. केसर /फुड कलर घाला मस्त परतुन घ्या.
- 8
आणि वाफेवर 4 ते 5 मिनिटे छान शिजवुन घ्या. तयार आहे गरमागरम नारळी भात
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या