कलरफुल उकडीचे मोदक (ukadcihe modak recipe in marathi)

#मोदक #प्रसाद #प्रसादाचीरेसिपी
हे कलरफुल उकडीचे मोदक मी प्रथमच ट्राय करून पाहिले आणि छान जमून आले.
यात दोन गोष्टी नवीन ट्राय केल्या, त्या म्हणजे मी थोडे चोको चिप्स चा वापर केला सारणात चॉकलेट फ्लेवर साठी.
आणि दुसरी म्हणजे आपली गव्हाची कणिक वापरली मोदकांसाठी.
आपण शक्यतो तांदळाचे पीठ किंवा मावा वापरतो मोदक करण्यासाठी. पण मी तांदळाचे उकडीचे मोदक "नैवेद्य" थीम मध्ये केले असल्याने गव्हाची कणिक वापरून मोदक केले आहेत.
जर तुमची गव्हाची कणिक जर थोडी उरली असेल तर हे मोदक नक्की ट्राय करून पाहा.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम सारण करून घेऊ. पॅनमध्ये तूप गरम करून घ्या व त्यात गूळ व खोबरं घालून मिक्स करून घ्या. गुळ वितळू लागेल.
- 2
आता त्यात ड्राय फ्रूट व चोको चिप्स घालून परतून घ्या. ५ मिनिटे मिश्रण एकजीव करून घ्या व सारण तयार आहे. (चोकोचिप्स वापरल्याने मी वेलचीपूड चा वापर केला नाहीये).
- 3
आता कणिक जादाची मळलेली होती म्हणून मी ती वापरली. तुम्ही मळून घेऊ शकता तुमच्या आवश्यकतेप्रमाणे. कणिक जाडसर मळावी. कणकेचे दोन भाग करून दोन फूड कलर घालून पुन्हा कणिक मळून घ्या. मी पिवळा व लाल हे रंग वापरले आहेत. आता याचे छोटे गोळे करून घ्या व छोटी पारी लाटून त्यात सारण भरून मोदकाचा आकार देऊन घ्या.
- 4
सर्व मोदक करून घ्या व वरून केसर काड्या लाऊन १५ मिनिटे वाफवून घ्या. मोदक तयार आहेत.
- 5
वरून तूप घालून सर्व्ह करा स्वादिष्ट आणि कलरफुल उकडीचे मोदक!!!
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या