उपवासाचे पॅनकेक (upwasacha pancake recipe in marathi)

पॅन केक ची थीम या दिवसापासून आली त्या दिवसापासून मी काही ना काही कारणाने बिझी होते. आज अगदी शेवटचा दिवस आला तरी पण मला पॅन केक बनवण्याचा उत्साह नव्हता. पण एक गिफ्ट मला मराठी कुकपॅड टीम कडून आज मॅंगो थीमसाठी आले. आणि विशेष म्हणजे तो मिनि पॅन केक आहे. आणि माझा उत्साहद्विगुणित झाला.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम भगर दहा ते पंधरा मिनिटे भिजवून घ्यावी
- 2
दहा ते पंधरा मिनिटानंतर भगर हिरवी मिरची जिरे मीठ शेंगदाणेआणि बटाटा किसून घालून वाटून घ्यावी.
- 3
आता मिनिट पॅन केक पॅन गॅसवर गरम करत ठेवावा त्याला तेलाने ग्रीसिंग करावे. आता त्यात तयार सारणाचे छोटे-छोटे पॅनकेक घालावे व दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावे
- 4
आता चटणीसाठी खोबरे हिरवी मिरची जिरे व आवडीनुसार मीठ व साखर घालून चटणी वाटून घ्यावी.
- 5
आता तयार गरमागरम झटपट उपवासाचे पॅनकेक चटणी किंवा लिंबाच्या लोणच्याबरोबर सर्व करावे
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या