बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी आणि कचोरी
बाकरवडी हा पारंपरिक पदार्थ आहे. खमंग, खुशखुशीत बाकरवाडी म्हणजे पर्वणीच. म्हणूनच आज ही रेसिपी
छोट्या भुकेला आणि सुखा खाऊ म्हणून उत्तम पर्याय आहे
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी आणि कचोरी
बाकरवडी हा पारंपरिक पदार्थ आहे. खमंग, खुशखुशीत बाकरवाडी म्हणजे पर्वणीच. म्हणूनच आज ही रेसिपी
छोट्या भुकेला आणि सुखा खाऊ म्हणून उत्तम पर्याय आहे
कुकिंग सूचना
- 1
मैदा आणि बेसन मिक्स करून त्यात बेसन घाला. मग त्यात गरम तेल घालून चमच्याने हलवून घ्या सर्व पिठाला तेल लागले पाहिजे आणि हातानी त्याचे मुटके झाले पाहिजे
- 2
त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून पीठ एकदम घट्ट मळून घ्या
- 3
आता पॅन मध्ये सुखे खोबरे, कोथिंबीर, जिरे, आणि तीळ क्रमाने भाजून घ्या
- 4
आता भाजलेले मिश्रण मिक्सर पॉट मध्ये घाला त्यात तिखट, मीठ, साखर, 3 टेबलस्पून शेव घालून वाटून घ्या
- 5
आता आधीच मळून ठेवल्या पिठाची पातळ पोळी लाटा. त्यावर चिंचेचे पाणी लावा. मग सारण पसरवा आणि शेव घालून एकदा लाटणं फिरवून घ्या.
- 6
मग त्याचा रोल बनवून कट करा व सर्व वडी थोडासा प्रेस करून घ्या
- 7
आता मंद आचेवर बाकरवडी तळून घ्या. गरम किंवा थंड कशीही सर्व्ह करा भारीच लागते
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडी आणि कचोरी रेसिपीजलहान मुलांच्या छोट्या छोट्या भुकेसाठी उत्तम पर्याय. त्याच बरोबर मोठे ही तेवढीच आनंदात एन्जॉय करतात.. Sampada Shrungarpure -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी हा मूळचा गुजरात चा असलेला पदार्थ महाराष्ट्रात ही प्रसिद्ध आहे. विशेषतः पुण्याची चितळे भाकरवाडी खूप प्रसिद्ध आहे. कुरकुरीत आणि खमंग आंबट गोड किंचित तिखट चवीची ही बाकरवडी खूप चविष्ट लागतेच शिवाय बरेच दिवस टिकते. त्यामुळे प्रवासाला जाताना खाऊ म्हणून न्यायला बाकरवडी छान पर्याय आहे. Shital shete -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीमुलांच्या छोट्या छोट्या भुकेसाठी असलेला उत्तम पर्याय म्हणजे बाकरवडी. मुलांनाच नाही तर मोठ्या ना देखील आवडणारा पदार्थ...आंबट गोड तिखट अशी मस्त चव असते या बाकरवडी ला... डब्बा मध्ये भरून दहा ते पंधरा दिवस तुम्ही वापरू शकता.एवढी मस्त टिकणारी चटपटीत रेसिपी म्हणजे *बाकरवडी*. Vasudha Gudhe -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी खमंग खुसखुशीत अशी महाराष्ट्रातील फेमस बाकरवडी ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते मधल्या वेळेत खायला किंवा संध्याकाळच्या छोट्या-छोट्या भुकेसाठी चटपटीत अशीही भाकरवडी खायला खूपच छान लागते तसेच मुलांना खाऊ साठी डब्यात द्यायलाही छान आणि झटपट होते तर पाहूयात बाकरवडी ची पाककृती. Shilpa Wani -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी आणि कचोरी सर्वांचा आवडता टी टाइम पदार्थ. म्हणजे चहा आणि बाकरवडी आणि काय पाहिजे. तिखट, गोड, आंबट खुशखुशीत बाकरवडी 2-3 अशाच जातात पोटात. सासुबाईनां दिवाळी म्हटलेले करू पण तेव्हा आम्ही मसाला वाडी करून पाहिली होती आता चान्स मिळाला तर मी करून पाहिली. मस्त झाली सासुबाईनी तर शाब्बासकी दिली मस्त वाटल. बघू कृती. Veena Suki Bobhate -
क्रिस्पी बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#बाकरवडी क्रिस्पी बाकरवडीबाकरवडी म्हणजे ऑलटाइम फेवरेट स्नॅक.सर्वांच्याच परिचयाची आणि सर्वांना आवडणारी.बाकरवडी खाण्याचा आनंद काही निराळाच असतो.सहज तोंडात टाकायला आवडणारी छान,चमचमीत,कुरकुरीत,खुसखुशीत स्वादिष्ट घरघूती बाकरवडी.ही खाऊन लगेच फस्त करायची असते टिकवायची अजिबात नसते .कुठलाही पदार्थ करताना त्यातलं प्रमाण मस्त जमावं लागतं आणि तो पदार्थ करण्याचा आनंद घ्यावा लागतो. तेवढी काळजी घेतली, की उत्तम पदार्थ तयार ! प्रत्येकाच तिखट मिठाच प्रमाण कमी जास्त असू शकत. Prajakta Patil -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी हा पदार्थ आमच्या कडे खूपच आवडतो. कधी तरी करीन असं म्हणत शेवटी आज घरी करण्याचा मुहूर्त लागला. पूण्याच्या चितळ्यांची बाकरवडी खुपच छान लागते. तशीच बाकरवडी घरी करण्याचा प्रयत्न मी केला आहे. खूपच छान खमंग आणि खुसखुशीत बाकरवड्या झाल्या, माझ्या घरच्यांना पण खूपच आवडल्या. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी बाकरवडी खायला अप्रतिम लागते . बाकरवडी महाराष्ट्राबरोबर गुजरात मध्ये खूप फेमस आहे. खुसखुशीत आणि खमंग अशी बाकरवडी चहासोबत सहज खाण्यासाठी खूप छान स्नॅक आहे. Najnin Khan -
-
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा संत ज्ञानदेव,संत तुकाराम,समर्थ रामदास स्वामी,शिवाजीमहाराज,अटकेपार झेंडे रोवणारे पेशवे,लता दिदी,सचिन तेंडुलकर, कुसुमाग्रज,विंदा,पुल. वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचे वरदान पण लाभलंय महाराष्ट्राला..मिसळ पाव,बटाटेवडा,झुणका भाकरी,पुरणपोळी,उकडीचे मोदक आणि *खमंग बाकरवडी हो हो..जरी बाकरवडीचे रोप गुजरात मधलं असलं तरी महाराष्ट्रातील चितळे बंधूंनी या रोपाचा वेलु गगनावरी नेलाय...पार साता समुद्रापार देखील या बाकरवडीचा आस्वाद मोठ्या चवीचवीने घेतला जातोय.खरंच अशी ही *चव* किती महत्त्वाची आहे ना...जिभेवर पण आणि आपल्या जीवनात सुद्धा...आपल्या रोजच्या जगण्यात सुद्धा चव असेल तरच आपली आयुष्यरुपी खाद्ययात्रा नीरस ,बेचव न राहता सदैव खमंग चवदार होईल या बाकरवड्यांसारखी...आणि हे फक्त आपल्या स्वतःच्या सकारात्मक विचारांमुळेच शक्य होईल..पटतंय ना माझं मत तुम्हांला. तर अशी ही मनामनांवर अधिराज्य गाजवणारी बाकरवडी पुण्यात पाऊल टाकताच बाकरवडीचा वानोळा घेऊन जाणे हा शिरस्ताच. Soo आपण पण ही खमंग बाकरवडीची खाद्यसंस्कृती *टिकवून* ठेवण्यासाठी आधी ही रेसिपी करुया.. Bhagyashree Lele -
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#बाकरवडी#रेसिपीबुक #week12बाकरवडी आणि कचोरी रेसिपी2मी varsha deshpande यांचीं रेसिपी cooksnap केली आहे, खूपच सुंदर झाले आहेत बाकरवडी, पहिलाच प्रयत्न खुप छान जमली. Varsha Pandit -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12#बाकरवडी पुणे महाराष्ट्र स्पेशल पदार्थ रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडीचहा सोबत किंवा मधल्या वेळात खायला चटपटीत आणि खुसखुशीत पदार्थ म्हणजे बाकरवडी. Supriya Devkar -
-
गव्हाची बाकरवडी (wheat bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी माझी खूप आवडती पण मी नेहमीच गव्हाच्या पिठाची करते. खूप छान खुशखुशीत होतात नक्की करून बघा. Monal Bhoyar -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडीची मस्त थीम मिळाली.केली खमंग, कुरकुरीत बाखरवडी चहासोबत खायला.मस्त झाली. Preeti V. Salvi -
-
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीमी बाकरवडी घरी कधीच केली नव्हती पण आज cookpad मुळे करून पहिली. Mansi Patwari -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी हा गुजरात, महाराष्ट्रातील लोकप्रिय पदार्थ आहे. अतिशय चविष्ट खुसखुशीत बाकरवडी एकदा खायला सुरुवात केली की थांबणं कठीण होतं. चविष्ट सारण आणि खुसखुशीत बाहेरचं आवरण ह्या दोन गोष्टी बाकरवडीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ह्यात काही चुकलं तर परफेक्ट बाकरवडी होणार नाही. Sudha Kunkalienkar -
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी आणी कचोरी ...आंबट ,गोड ,तीखट, चविची चटपटीत बाकरवडी सगळ्यांना आवडेल अशी क्रंची ,खूसखूशीत तयार झाली ... Varsha Deshpande -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी म्हंटलं कि पुण्याची चितळ्यांची बाकरवडी डोळ्यासमोर उभी राहते आणि जिभेवर त्याची चव रेंगाळतेच.बाकरवाडी किंवा भाकरवाडी हा पारंपारिक मराठी मसालेदार पदार्थ आहे, जो महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमध्ये लोकप्रिय आहे आणि पुण्याच्या बाजारपेठांमध्ये व्यापकपणे उपलब्ध आहे. नारळ, खसखस, तीळ याचा मसाला वापरून हा तयार केला जातो.मी पण मसाल्यात हे पदार्थ वापरुन पहिल्यांदाच बाकरवडी केली आहे. Prachi Phadke Puranik -
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीअगदी सोपी पद्धत आहे घरात असलेल्या साहित्याने छानशी बाकरवडी बनवली आहे. Purva Prasad Thosar -
बेक्ड पालक बाकरवडी (palak bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी हा तळून बनवला जाणारा फरसाण चा पदार्थ. रोज रोज तळलेले पदार्थ खायला नको म्हणून बेक करून बाकरवडी बनवली Kirti Killedar -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी सरतेशेवटी या आठवड्यात दिलेल्या बाकरवडीचे प्रात्यक्षिक करायचे ठरविले आणि कृतीची शोधाशोध सुरु झाली. घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातच मग बाकरवडी तयार केली. पहिल्यांदाच करीत असल्यामुळे मनात धाकधुक होती. पण शेवटी चांगले झाले.... Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या (2)