चॉकलेट डोनट (chocolate donut recipe in marathi)

Prajakta Patil @cook_19647252
चॉकलेट डोनट (chocolate donut recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका बाउल मध्ये मैदा चाळून घ्या. त्यामध्ये मीठ, साखर, यीस्ट, मिसळून घ्या. कोमट दुधाने पीठ 10 ते 15 मिनिटे छान मळून घ्या.पीठ व्यवस्थित मळणे फार महत्वाचे आहे.झाकण ठेवून मळलेले पीठ 35 मिनिटे बाजूला ठेवा.पिठाचा गोळा मस्त फुलून येतो. दुप्पट होतो.
- 2
एक गोळा घेऊन पोळी थोडी जडसारच लाटायची.जो आकार आपल्याला हवा त्या आकारात कापू शकता. डोनटचा गोलसर आकार वाटीने द्यावा. मधोमध छोट्या झाकणाने अजून छोटा गोल करून घ्यायचा
- 3
तूप गरम करून मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्यावेत. म्हणझे डोनट आतून कच्चे राहत नाहीत.अशाप्रकारे सर्व डोनट तळून थंड होण्यास ठेवावे
- 4
डिशमध्ये थोडी मध पसरवा. त्यावर पिठीसाखर, रंगीत बडीशेप भुरभुरवा. एक डोनट घेऊन मध पिढीसाखरेचे मस्त कोटिंग करा.
- 5
चॉकलेट सिरप ने सजवा.अशाप्रकारे यम्मी डोनट तय्यार
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13682706

















टिप्पण्या (4)