एगलेस टोमॅटो आमलेट (eggless tomato omelette recipe in marathi)

#GA4#Week2#, आज मी नाश्त्याला एगलेस टोमॅटो आमलेट बनवले आहे, अगदी झटपट तयार होणारी रेसिपी,,,,तुम्ही पण करून बघा तुम्हालापन नक्कीच आवडेल
एगलेस टोमॅटो आमलेट (eggless tomato omelette recipe in marathi)
#GA4#Week2#, आज मी नाश्त्याला एगलेस टोमॅटो आमलेट बनवले आहे, अगदी झटपट तयार होणारी रेसिपी,,,,तुम्ही पण करून बघा तुम्हालापन नक्कीच आवडेल
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम 1 कप बेसन आणि 2 टेबलस्पून रवा घ्यावा आणि नंतर मी इथे दाखविल्याप्रमाणे कांदा, टोमॅटो, मिरची कापून घ्यावे. नंतर एका बाउल मध्ये सर्वे एकत्र करून घ्यावे.
- 2
मग त्यामध्ये चवीपुरते तिखट, मीठ, जिरे, धनेपूड, अजवाईन, हळद, अल लहसून पेस्ट, टाकून त्याला एकजीव करून घ्यावे आणि नंतर त्या मध्ये थोडे थोडे पाणी टाकून त्याचे मिश्रण तयार करावे, आणि ते आपले तयार झालेले मिश्रण 15 मिनिटं झाकून ठेवावे.
- 3
नंतर गॅस वर तवा ठेऊन तव्याला थोडं तेल लाऊन ते मिश्रण तव्यावर पसरवावे, आणि मंद आचेवर त्याला एकीकडून शिजू द्यावे, आणि मग दुसरी बाजू पण अशीच खरपूस शिजवून घ्यावी। बस्स अश्याप्रकारे आपले एगलेस टोमॅटो आमलेट तयार
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)