खमंग खुसखुशीत नानखटाई (nankhatai recipe in marathi)

#नानखटाई #सप्टेंबर
साजूक तुपाची नानखटाई अप्रतिम लागते.मैद्याऐवजी कणिक वापरली तर नेहमीच्या नानखटाई पेक्षा पौष्टीक होतात.चवीला अप्रतिम आणि तोंडात विरघळून जाणारी होते.नानखटाई हा लहान मुलांसहित मोठ्यांनाही आवणारा पदार्थ...
नानकटाई हा पदार्थ चहा सोबत मधल्या वेळात खायला छान लागते. खूप गोड नसतो. नानकटाई इडली पात्रात बनवली आहे.

कुकिंग सूचना
- 1
एका बाउलमध्ये तूप आणि पिठीसाखर घेऊन पाच ते सात मिनिटे पुन्हा व्यवस्थित फेटून घ्या.गुठळ्या ठेऊ नका.साखर तुपात पूर्णपणे विरघळवून घ्यावी. मिश्रणाला मस्त क्रिमी टेक्श्चर येईल.
- 2
एका बाउल मध्ये कणिक, बेसन, रवा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, वेलची पूड, व्हॅनिला इसेंस घालून मिसळून घ्या. रवा भाजून घ्यायची गरज नाही. रव्यामुळे नानखटाई क्रनची होते.हे मिश्रण तूप साखरेच्या मिश्रणात घालून चांगलं मळून घ्या. बाईंडिंगसाठी 1 चमचा दूध घाला.10 मिनिटे पीठ झाकून ठेवा.
- 3
पिठाचे छोटे गोळे बनवून तळहाताचा अलगद दाब द्या.हव्या त्या आकाराची बिस्कीटे बनवा. वर सुकामेवा लावा.इडलीपात्राला थोडे तूप लावून गोळे त्यावर ठेवा.इडली भांडायच्या तळाशी थोडे मीठ पसरवा.स्टँड भांड्यात ठेऊन झाकण लावून मंद आचेवर बिस्किटे भाजा. 20 ते 25 मिनिटे लागतील. मध्ये मध्ये चेक करत राहा.
- 4
थंड झाल्यावर कुरकुरीत होतात नानखटाई.नानखटाई हवाबंद डब्यात ठेवा
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (3)