हिरव्या मेथीचे पराठे (methi paratha recipe in marathi)

#GA4 #week2
आरोग्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचे खूप महत्व आहे, म्हणूनच डॉक्टर सुद्धा आपल्याला हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात पण आपण जेव्हा मेथीची भाजी बघतो तेव्हा मात्र अनेकजण नाके मुडतात आणि मुले सुद्धा खायला बघत नाही कारण मेथीची भाजी चवीला थोडी कडवट असते न म्हणून . पण मेथीच्या भाजीत अनेक उपयुक्त पोषकतत्वे असतात, मेथीच्या भाजीत असलेल्या अँटीऑक्सिडेंट गुणधर्मामुळे कर्करोग , मधुमेह व उच्च रक्तदाब याना प्रतिबंध होण्यास मदत होते. इतके फायदे असूनपन कोणी हिरवी मेथी ची भाजी खायला बघत नाही मग अश्यावेळी काय करायचं तर माझ्या मनात विचार आला की हिरव्या मेथीचे पराठे बनवूयात म्हणजे ते खायला पण चवदार लागेल आणि अश्याप्रकारे आपल्या पोटात पण जाईल तर चला मैत्रिणींनो कशाप्रकारे हिरव्या मेथीचे पराठे बनवले जातात ते आपण खालीप्रमाणे👇 बघुयात

कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम हिरवी मेथी ची भाजी स्वछ पाण्यानी धुवून घ्यावी.
- 2
नंतर मी वरील सांगितल्याप्रमाणे 2 वाट्या गव्हाचे पीठ, 1 वाटी तांदूळ पीठ घ्यावे आणि सोबत आलं - लहसून पेस्ट आणि 4 ते 5 हिरवी मिरची पेस्ट बनवून घ्यावा.
- 3
नंतर वरील सर्व एकत्र मिक्स करून त्यामध्ये चवीनुसार तिखट, मीठ, हळद, तीळ, धणेपूड आणि थोड थोड पाणी घालून त्याचा पातळ मिश्रण तयार करून घ्यावे.
- 4
त्या नंतर गॅस वर तवा गरम झाल्यानंतर तव्यावर आधी थोडा तेल सोडून त्यावर एका मोठ्या चम्मच च्या साहाय्याने आपले मिश्रण पसरवावे आणि बस्स मग त्याला दोन्ही बाजूने मागून-पुढून छान खरपूस शिजवून घ्यावे.
- 5
झाले तर मग अशाप्रकारे आपले गरमा गरम स्वादिष्ट मेथी पराठे तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)