पनीर चीज सॅन्डविच (paneer cheese sandwich recipe in marathi)

पनीर चीज सॅन्डविच (paneer cheese sandwich recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सगळ्यात आधी सॅन्डविच चा मसाला बनवण्यासाठी 150 ग्रॅम पनीर हाताने क्रॅश करून घ्यायचे, पॅन मधे 2 चमचे तूप घालून त्यात जिरे तडतडू द्यायचे नंतर त्यात कापलेला कांदा, ढोबळी मिरची 2 मिनिट मिडीयम फ्लेम वर थोडा परतून घ्यायचा त्यात कापलेले टोमॅटो घालायचे, नंतर 1/2 चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1/4 चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून परतून घ्यायचे. नंतर त्यात क्रॅश केलेले पनीर मिक्स करून मसाला बानाऊन घ्यायचा. बनलेल्या मसाला मध्ये 1/2 लिंबू चा रस सोडायचा आणि नीट मिक्स करून घ्यायचे आणि वरून कोथिंबीर घालायची.
- 2
ब्रेड ला 1 साईड नी बटर लावून घ्यायचे, त्यात बनलेला मसाला लाऊन त्यावर चीज क्रॅश करून घ्यायचे, नंतर दुसरी ब्रेड त्यावर लाऊन घ्यायची आणि थोड प्रेस करून घ्यायची, पॅन मधे थोड बटर लाऊन मसाला टाकून तयार केलेले ब्रेड दोन्ही साईड ला सोनेरी होपर्यंत परतून घ्यायचे. नंतर प्लेट मध्ये काढून पूर्ण किंवा आवडी नुसार तिरपे कट करून टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करायचे..
Keywords
Similar Recipes
More Recipes








टिप्पण्या (3)