बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका बाउल मध्ये मैदा, बेसन, ओवा थोडंसं मीठ टाकून मिक्स करून घ्यावे. मग यामध्ये कडकडीत शेंगदाण्याच्या तेलाचे मोहन टाकून हाताने छान मळून घ्यावे. नंतर थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असा गोळा मळून झाकून ठेवावा.
- 2
आता एका कढई मध्ये बडीशेप व धने टाकून मंद आचेवर भाजून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये तीळ व खसखस टाकून परत थोड दोन-तीन सेकंद होऊ द्या व त्यामध्ये खोबरेकीस कोथिंबीर टाकून ते सुद्धा भाजून घ्यावे. मग हे सर्व जिन्नस थंड झाल्यावर त्यामध्ये धने पावडर, तिखट,मीठ,साखर टाकून मिक्सरमधून पावडर तयार करावे. आपला बाकरवाडी चा मसाला तयार आहे.
- 3
आता भिजवलेल्या मैद्याच्या गोळ्याची पातळशी पारी लाटून घ्यावी.साईडने कडा जाडसर असाव्या. मग त्या पारीवर चिंचगूळाची चटणी लावून घ्यावी.
- 4
चिंचगूळाची चटणी लावून झाल्यावर त्यावर तयार केलेल्या बाकरवडी चा मसाला लावून घ्यावा. व त्यावर शेव पण लावून घ्यावे. मग लाटण्याने हलकस प्रेस करून घ्यावे. जेणेकरून सगळा मसाला त्या पारीला चिटकून राहील. मग रोल करून घ्यावा खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे...
- 5
रोल करून झाल्यावर चाकूने 1 इंचाचे अंतर घेऊन कट करून घ्यावेत.कट करून झाल्यावर प्रत्येक बाकरवाडी ला हलकसं प्रेस करून घ्यावे. जेणेकरून मसाला बाहेर निघणार नाही. अशाच प्रकारे सगळ्या बाकरवड्या तयार करून घ्याव्यात व तेलामध्ये पाच-सात मिनिटं ब्राऊनसर होईपर्यंत छान तळून घ्याव्यात.
- 6
आपल्या खमंग अशा खुसखुशीत बाकरवड्या खाण्यासाठी रेडी आहे... तेव्हा नक्की करून बघा आणि सांगा कशा झाल्यात.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- व्हेज सँडविच (veg sandwich recipe in marathi)
- इन्स्टंट रवा बेसन ढोकळा (rava besan dhokla recipe in marathi)
- चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi)
- गाजर आणि मुंग डाळ कोशिंबीर (gajar moong dal koshimbir recipe in marathi)
- चीजी स्प्रिंग रोल डोसा (cheese springroll dosa recipe in marathi)



















टिप्पण्या (3)