चटपटीत सुरणाचे काप (suranache kaap recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सुरण तीन ते चार पाण्यात स्वच्छ धुऊन घ्यावे. त्याचे साल काढून त्याचे चौकोनी काप करून घ्यावे.एकीकडे कुकर मध्ये पाणी तापायला ठेवावे.
- 2
कुकर चे पाणी तापल्यावर त्यात मीठ व चिंचेचा कोळ ऍड करावे.सुरणाचे काप एका चाळणीत घ्यावे व ही चाळणी कुकर मध्ये ठेवावे. चाळणी कुकर मध्ये ठेवल्यानंतर कुकर चे झाकण लावून घ्यावे व दहा मिनिटे सुरण शिजू द्यावे. सुरण अशी शिजवावे जेणेकरून खूप मऊ पण नको आणि खूप कडक पण नको.
- 3
एक नॉन स्टिक पॅन गॅसवर तापायला ठेवावे. त्यावर तेल घालावे व शिजलेले सुरणाचे काप एकेक करुन नॉनस्टीक पॅनवर ठेवावे. सुरणाच्या कापे वर तिखट हळद मीठ व धणे पूड भूरकवावी.
- 4
दोन्ही बाजूने क्रिस्पी शिजवत दोन्ही बाजूने सर्व साहित्य सुरणाच्या कापावर घालावे. सुरण पूर्णपणे शिजल्यानंतर एका प्लेटमध्ये सजवावे व त्यावरून भरपूर चाट मसाला घालावे. आपले चटपटीत सुरणाचे काप रेडी आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी (khamang khuskhushit kothimbir wadi recipe in marathi)
- कुळीथ पुदिना पराठे (kudith pudina parathe recipe in marathi)
- शाही बेसन पोहा वडी. (saahi besan poha vadi recipe in marathi)
- ड्रायफ्रूट गुजिया (dryfruit ghujiya recipe in marathi)
- तेलंगणा शाॅप स्टाईल क्रंची मुरूक्कूलू (crunchy murukulu recipe in marathi)















टिप्पण्या