ड्रायफ्रूट गुजिया (dryfruit ghujiya recipe in marathi)

Mangala Bhamburkar
Mangala Bhamburkar @cook_26659112
Amravati

#cookpadTurns4
#cookwithdryfruits
#dryfruitgujiya
Happy Birthday cookpad
ड्रायफ्रुट्स मध्ये मिनरल्स, खनिज, प्रोटिन्स, फायबर्स व विटामिन्स भरपूर प्रमाणात असतात. रोजच्या न्याहारीसाठी ड्रायफ्रूट्स एक चांगला ऑप्शन आहे. ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने दिवसभर न्यूट्रिशन सोबतच एनर्जी टिकून राहते. ड्राय fruits mule हृदय मजबूत बनते मेंदूचे फंक्शन सुरळीत होते त्यासोबतच कॅन्सर डायबिटीस सारख्या असाध्य रोगावर मात करता येते. बदामामध्ये मोनो सॅच्युरेटेड fatty acid, पोलि unsaturated fatty acid आणि फायबरचे प्रमाण अधिक असते रक्तदाब कमी होतो व बद्धकोष्ठता दूर करते व व्हिटॅमिन E समृद्ध असते. काजूमध्ये एंटीऑक्सीडेंट जीवनसत्त्वे व खनिजे परिपूर्ण असतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

६० मिन.
४ व्यक्ती
  1. 1 कपमैदा
  2. 1/4 वाटीबारीक रवा
  3. 1 वाटीकाजू
  4. 1 वाटीबदाम
  5. 1 टेबलस्पूनखसखस
  6. 1 वाटीखोबरा कीस
  7. 10-12केशर काड्या
  8. 1 टीस्पूनविलायची पुड
  9. पाणी
  10. तळण्याकरता तेल किंवा तूप
  11. चिमुटभरमीठ

कुकिंग सूचना

६० मिन.
  1. 1

    प्रथम मैदा, रवा व चिमूटभर मीठ चांगलं मिक्स करा त्यात दोन टेबलस्पून साजूक तुपाचे मोहन घाला, थोडं थोडं पाणी घालून,अर्धा-एक तास पीठ थोडं घट्ट भिजवून झाकून ठेवा.

  2. 2

    अर्धा एक तासाने पीठ फुगेलं व गोळा मोठा होईल.

  3. 3

    सारण- एक वाटी खोबरा कीस,बदाम व काजू साजूक तुपात छान भाजून घ्या म्हणजे ते क्रंची होतील. खसखस मंद आचेवर भाजून घ्या व हे सर्व मिक्सर मधून जाडसर बारीक करा.

  4. 4

    अर्धी वाटी साखरेचा एक तारी पाक करा व त्यात बारीक केलेले काजू बदाम खोबरा कीस खसखस व वेलची पूड घाला सारण थोड ओलसर हव व फिक्क असेल कारण नंतर गूजीया पाकात बुडवून ठेवाव्या लागतात.

  5. 5

    भिजवलेल्या मैदा,रव्याच्या गोळा,हाताला थोडे तूप लावून मऊसूत मळा नंतर पुरी एवढी पोळी लाटा व त्यावर सारण पसरवा कडा दाबून घ्या व मुरड घाला झालेल्या गुजिया तेलात किंवा तुपात तळून घ्या.

  6. 6

    एक तारी पाक करा व तळलेल्या गुजीया पाकात दोन तीन मिनिटं गरम असतानाच टाका,त्याला पाक चिकटेल.

  7. 7

    प्लेट मध्ये काढा व केसर काड्या व पिस्ता तुकडे टाकून गार्निशिंग करा,आठ दहा दिवस ह्या गूजिया तशाच कडक राहतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mangala Bhamburkar
Mangala Bhamburkar @cook_26659112
रोजी
Amravati

Similar Recipes