पालक सूप (palak soup recipe in marathi)
#GA4 Week16
देशाच्या अनेक भागांमध्ये थंडीचा जोर वाढतो आहे. अशा दिवसांमध्ये फायबरयुक्त, भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व असलेले पालकाचे सूप पिणे आरोग्यदायी आहे. असे गरमागरम सूप प्यायल्यामुळे थंडीने थरथर कापणा-या शरीराला उबदार वाटते आणि अंगात नवा उत्साह संचारतो. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही पालकाचे सूप हा एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग बघूया पालक सूप कसे बनवायचे.

कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पालक थोडे पाणी घालून कुकरमध्ये एक शिट्टी करुन वाफवून घ्या.
- 2
दुसरीकडे कांदा आणि टोमॅटो चिरुन घ्या. वाफवून घेतलेला पालक गार झाल्यावर मिक्सरमधून पालक, टोमॅटो आणि आलं बारीक वाटून घ्या.
- 3
कढईमध्ये तूप घालून जि-याची फोडणी करुन त्यामध्ये कांदा लालसर परतून घ्या. मग त्यामध्ये तिखट, मिरपूड घाला आणि पालक - टोमॅटोची केलेली प्युरी, चवीनुसार मीठ, थोडे पाणी घालून सर्व एकत्र ढवळून घ्या. उकळी आल्यावर गॕसवरुन उतरुन घ्या. गरमागरम पौष्टिक पालक सूप तयार. सजावटीसाठी वरुन कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या