तीळ गूळाचे लाडू (til gudache ladoo recipe in marathi)

#मकर
तिळगूळ घ्या गोड गोड बोला!!
भास्करस्य यथा तेजो
मकरस्थस्य वर्धते।
तथैव भवतां तेजो
वर्धतामिति कामये।।
मकरसङ्क्रान्तिपर्वणः सर्वेभ्यः शुभाशयाः।
अर्थात
जसं सूर्याचं तेज मकर संक्रमणानंतर वाढत जाते,
तद्वतच तुमचं तेज, यश, कीर्ती वर्धिष्णू होवो ही मनोकामना.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
तीळ गूळाचे लाडू (til gudache ladoo recipe in marathi)
#मकर
तिळगूळ घ्या गोड गोड बोला!!
भास्करस्य यथा तेजो
मकरस्थस्य वर्धते।
तथैव भवतां तेजो
वर्धतामिति कामये।।
मकरसङ्क्रान्तिपर्वणः सर्वेभ्यः शुभाशयाः।
अर्थात
जसं सूर्याचं तेज मकर संक्रमणानंतर वाढत जाते,
तद्वतच तुमचं तेज, यश, कीर्ती वर्धिष्णू होवो ही मनोकामना.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
कुकिंग सूचना
- 1
सगळे साहित्य तयार करून घ्या.
- 2
आता खोबरं, तीळ खमंग भाजून घ्या
- 3
आता पॅन मध्ये तूप घाला व त्यात गूळ घाला, व त्याचा सिम गॅस वर पाक करून घ्या. व तो नीट तयार झाला आहे की नाही ते बघा. एका डिश मध्ये थोडे पाणी घेऊन त्यात जर गुळाचा पाक गोळी प्रमाणे राहिला तर तो पाक तयार आहे असे समजावे
- 4
पाक तयार झाला
- 5
आता त्यात खोबरं किस, शेंगदाणा कूट, तीळ, वेलची आणि जायफळ पावडर घालून मिक्स करून घ्या, व 1 ते 2 मिनिटे घातून घ्या. त्याचा गोळा तयार होईल, पॅन मधून मिश्रण सुटेल. हाताला थोडे तूप लावून त्याचे लाडू वळून घ्या
- 6
लाडू वळून तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes
















टिप्पण्या (3)