खुस खुशीत गुळाची पोळी (gudachi poli recipe in marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

खुस खुशीत गुळाची पोळी (gudachi poli recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
21 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपगूळ
  2. 1/4 कपखसखस
  3. 2 टेबलस्पूनशेंगदाणे
  4. 1/2 कपतीळ
  5. 1 कपबेसन
  6. 3 टीस्पूनवेलची पावडर
  7. 1/4 टीस्पूनजायफळ पावडर
  8. 2 टेबलस्पूनसुक खोबरं किस
  9. कव्हर:-
  10. 2 कपगव्हाच पीठ
  11. 1/4 टीस्पूनमीठ
  12. 1 टीस्पूनतेल

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    सगळे साहित्य तयारी करून घ्या, त्यात तीळ, खोबरं, शेंगदाणे, खसखस भाजून घ्या. गूळ किसून घ्यावा.

  2. 2

    बेसन तेलावर खमंग भाजून घ्यावे सोनेरी रंगावर.

  3. 3

    भाजून घेतलेले कोरडे जिन्नस आणि त्यात वेलची जायफळ पावडर घालून बारीक पेस्ट करून घ्या.

  4. 4

    गूळ व वाटून घेतलेली कोरड्या जिन्नस पेस्ट घालून मिक्स करा, व भाजून घेतलेलं बेसन घालून एकजीव करून घ्या

  5. 5

    गव्हाचे पीठ नेहमी सारखे भिजवून घ्या, व त्याचे गोळे करून घ्या, त्याच प्रमाणे तयार गुळाचे गोळे करा.

  6. 6

    आता 2 गव्हाचा पिठाचे गोळे घ्या व ते पुरी प्रमाणे लाटून घ्या. व त्यातल्या एका पुरी वर गूळ पसरवून घाला, व दुसरी पुरी त्यावर ठेवून कडा दाबून घ्या

  7. 7

    आता कोड्या गव्हाचा पिठात घोळवून पोळी हलक्या हाताने लाटून घ्यावी, एकीकडे तवा तापत ठेवून पोळी खमंग भाजून घ्या

  8. 8

    पोळी उलटल्यावर खालचा बाजूने खमंग भाजली गेली की पेपर वर गार व्हायला ठेवा, अश्या पद्धतीने सगळ्या पोळ्या करून घ्या.

  9. 9

    सर्व्ह करताना गायीचा तुपा बरोबर आस्वाद घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes