चाकवतची ताकभाजी (Chakvatchi takbhaji recipe in marathi)

#भाजी# हिवाळ्याच्या दिवसांत चाकवत ची भाजी मिळते. या भाजीची, डाळ भाजी किंवा ताक भाजी, अथवा गोळे करतात. मी आज ताक भाजी केली आहे. गरमागरम भाकरी सोबत मस्त लागते ही भाजी...शिवाय सोबत कांदा, आणि तळलेली हिरवी मिरची असली काही विचारूच नका...तर बघू या..

कुकिंग सूचना
- 1
चाकवत निवडून 5 मिनिट पाण्यात ठेवून स्वच्छ धुवून घ्यावी.
- 2
मिक्सर मधून फिरवून पेस्ट करून घ्यावी.
- 3
ताकात डाळीचे पीठ टाकून चांगले एकत्र घुसळून घ्यावे. आता गॅसवर एक कढई ठेवून त्यात तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जीरे मोहरी आणि हिंग टाकावा.
- 4
यातच कढीपत्ता, मिरची आणि वाटाणा टाकावा.आले लसूण पेस्ट टाकावी. तसेच हळद, धणे पूड, आणि तिखट टाकून मिक्स करावे.
- 5
त्यानंतर चाकवतची तयार केलेली पेस्ट टाकून मिक्स करून घ्यावे. थोडेसे पाणी टाकून 2 मिनिट शिजवावे.
- 6
1-2 उकळ्या आल्यानंतर त्यात भिजविलेले डाळीचे पीठ टाकून चांगले मिक्स करून घ्यावे. गरजेप्रमाणे पाणी टाकावे.
- 7
झाकण ठेवून 4-5 मिनिट शिजवून घ्यावे. पाहिजे त्या प्रमाणात घट्ट झाल्यावर त्यात कोथिंबीर टाकावी. ही भाजी, कढी पेक्षा घट्ट आणि पिठल्यापेक्षा पातळ असावी.
- 8
आता तेलात जीरे, मोहरी आणि लसूण पाकळ्या चिरून टाकून तडका तयार करावा. आणि भाजीत टाकावा. की ताक भाजी, गरमागरम भाकरी, आणि सोबत तळलेली हिरवी मिरची आणि कांद्यासोबत वाढावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- टि टाईम एगलेस ऑरेंज जेस्ट सेमोलिना केक (Eggless Orange Jest Semolina Cake recipe in marathi)
- "रेड वेलवेट कप केक" (red velvet cupcake recipe in marathi)
- शेवई कस्टर्ड विथ मिक्स फ्रुट्स क्रिम ( Shevai Custard with Mix Fruits Cream recipe in marathi)
- हिडन सरप्राईज हार्ट केक (hidden surprise heart cake recipe in maathi)
- साल्सा फ्रेस्का सॉस......पिको द गायो.. (Pico de Gallo recipe in marathi)

टिप्पण्या