खमंग व रुचकर लसूण चटणी (lasun chutney recipe in marathi)

#KS1 लसूण खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे ..लसूण चटणी वाटण्यासाठी पारंपरिक पाटा वरवंटा वापरला आहे.काही गोष्टी अनायसे आपल्याला वारशाने मिळतात आणि त्या आयुष्यभर जपायला खूप जणांना आवडत. तसाच हा आमचा पाटा वरवंटा खूप वर्षांपूर्वीचा आहे. मस्त झणझणीत लसूण चटणी करायला घेतली होती. पाटा वरवंटा धुवून पुसून स्वच्छ केला. पाटा वरवंटा वापरून बनविलेली चटणी मिक्सर/ग्राईंडर मधल्या चटणीपेक्षा अधिक सरस व चवदार बनते कारण यात घटक ठेचले व वाटले जातात व त्याची चव भन्नाट येते.जरा जास्त कष्ट पडतात. पण काय मस्त झणझणीत चव येते चटणीची...अहाहा....😋😋😋चटणी कोरडीच पाहिजे असल्या मुळे पाणी अजिबात घालू नये. वाटताना खोबऱ्याचे तेल सुटतेच.चटणी खूप चिकट होऊ नये म्हणून सर्व जिन्नस गार झाल्यावरच वाटावेत. कमीतकमी साहित्य, झटपट होणारी व आठवड्याभराची टिकणारी जास्त बनवली तर महिना दोन महिने आरामात टिकते.

कुकिंग सूचना
- 1
लसूण सोलून ठेवा. खोबरे पातळ चिरून घ्या.
- 2
प्रथम खोबरं कढईत कोरडेच मंद आचेवर भाजून घ्या. रंग बदलल्यावर गार करायला ठेवा. त्याच गरम कढईत तेल घालून सोललेला लसूण हलका परतवून घ्या.जीरे व तीळ भाजून घ्या.मिरच्या अर्धा मिनिटभर मंद आचेवर भाजाव्यात,जेणेकरून क्रिस्पी होऊन पटकन वाटल्या जातात.सर्व जिन्नस थंड झाले की काश्मिरी मिरची पावडर व मीठ मिसळून घ्या.
- 3
पाटा वरवंटा स्वच्छ धुवून पुसून तयार ठेवावा. पाट्यावर छान बारीक चटणी वाटून घ्यावी.(पाटा वरवंटा नसल्यास सर्व जिन्नस मिक्सरला बारीक वाटून घ्यावेत)
- 4
हि चटणी खिचडी, भाकरी- चपाती, वडापाव तुम्हाला आवडणारे कुठलेही स्नॅक्स या सोबत खायला एकदम झकास.ही चटणी काचेच्या हवाबंद बरणीत भरुन फ्रिजमधे ठेवावी. जर कोरडे हवामान असेल तर बाहेरच आठवडाभर छान टिकते
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
- गरम भेळ (garam bhel recipe in marathi)
- साऊथ इंडियन टोमॅटो चटणी (south indian tomato chutney recipe in marathi)
- रेस्टॉरंट स्टाईल पनीर लसूणी करी (paneer lasooni curry recipe in marathi)
- लेफ्ट ओवर भाकरीचा चिवडा (leftover bhakhricha chivda recipe in marathi)
- साऊथ इंडियन पानियारम/कारा चटणी (kara chutney recipe in marathi)

टिप्पण्या