सुशीला (sushila recipe in marathi)

*जाऊ चला फिरायला.....दुर दुर...*
*गोडाधोडासंग... भिनली तिखटाची, सर सर...*
*एकदा तरी पहा... साखरेचं माहेरघर....*
*चला तर लगबग... सुरु करा सफूर....*
*आलं आलं कि,.... आपलं लातूर....*
लातूर बाजूला... न्याहारीत मान हिलाच पहिला ..!!
पौष्टिकतेची जणू राणीच.... म्हनत्यात तीला *सुशीला*
©Supriya Vartak-Mohite
सुशीला (sushila recipe in marathi)
*जाऊ चला फिरायला.....दुर दुर...*
*गोडाधोडासंग... भिनली तिखटाची, सर सर...*
*एकदा तरी पहा... साखरेचं माहेरघर....*
*चला तर लगबग... सुरु करा सफूर....*
*आलं आलं कि,.... आपलं लातूर....*
लातूर बाजूला... न्याहारीत मान हिलाच पहिला ..!!
पौष्टिकतेची जणू राणीच.... म्हनत्यात तीला *सुशीला*
©Supriya Vartak-Mohite
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य तयार करुन ठेवावे.
- 2
प्रथम एका भांड्यात पाणी घेऊन त्यात कुरमुरे ३-४ मिनीटे भिजवून मग जाळीवर निथळत ठेवावे.
- 3
आता एका कढईत तेल गरम करुन त्यात, फोडणी साहित्य घालून चांगले तडतडू द्यावे आणि मग त्यात कांदा घालून, मऊ होईपर्यंत परतून घ्यावा.नंतर त्यात मिरच्या व शेंगदाणे घालून कुरकुरीत परतून घ्यावे.
- 4
वरील मिश्रणात आता, चणा डाळे, थोडी कोथिंबीर, दाण्याचे कुट, लाल तिखट, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा चांगले परतून घ्यावे. शेवटी गॅस मंद आचेवर करुन त्यात, निथळत ठेवलेले कुरमुरे घालावे.
- 5
कुरमुरे घालून चांगले मिक्स करावे आणि २-३ मिनीटे परतून घ्यावे. नंतर प्लेटमध्ये काढून कोथिंबीर गार्निश करुन डिश सर्व्ह करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- लातूरचा सुप्रसिद्ध निलंगा राईस/आलू भात (aloo bhat recipe in marathi)
- वॉलनट डार्क चॉकलेट सेंटर फिल्ड कुकीज (walnut dark chocolate center filled cookies recipe in marathi)
- खान्देशी उडीद वडे (khandeshi udid wade recipe in marathi)
- निलंगा राईस (Nilanga rice recipe in marathi)
- करवंदाची चटणी (karvandachi chutney recipe in marathi)

















टिप्पण्या (3)