सुशीला (sushila recipe in marathi)

Supriya Vartak Mohite
Supriya Vartak Mohite @SupriyAmol
Mumbai and Anand

#KS5 #WEEK5 #RECIPE1

*जाऊ चला फिरायला.....दुर दुर...*
*गोडाधोडासंग... भिनली तिखटाची, सर सर...*
*एकदा तरी पहा... साखरेचं माहेरघर....*
*चला तर लगबग... सुरु करा सफूर....*
*आलं आलं कि,.... आपलं लातूर....*

लातूर बाजूला... न्याहारीत मान हिलाच पहिला ..!!
पौष्टिकतेची जणू राणीच.... म्हनत्यात तीला *सुशीला*
©Supriya Vartak-Mohite

सुशीला (sushila recipe in marathi)

#KS5 #WEEK5 #RECIPE1

*जाऊ चला फिरायला.....दुर दुर...*
*गोडाधोडासंग... भिनली तिखटाची, सर सर...*
*एकदा तरी पहा... साखरेचं माहेरघर....*
*चला तर लगबग... सुरु करा सफूर....*
*आलं आलं कि,.... आपलं लातूर....*

लातूर बाजूला... न्याहारीत मान हिलाच पहिला ..!!
पौष्टिकतेची जणू राणीच.... म्हनत्यात तीला *सुशीला*
©Supriya Vartak-Mohite

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०-२५ मिनीटे
४ जणांसाठी
  1. २५० ग्राम कोल्हापूरी कुरमुरे
  2. 1चिरलेला कांदा
  3. 1/2 कपचिरलेली कोथिंबीर
  4. 4-5चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  5. 3 टेबलस्पूनशेंगदाणे
  6. 2 टेबलस्पूनचणा डाळे
  7. 2 टेबलस्पूनशेंगदाणे कुट
  8. 2 टेबलस्पूनतेल
  9. 1 टेबलस्पूनलाल तिखट (ऐच्छिक)
  10. 1 टेबलस्पूनलिंबाचा रस
  11. चवीनुसारमीठ
  12. फोडणी साहित्य:
  13. 5-6कडिपत्ता पाने
  14. 1/2 टीस्पूनहळद
  15. 1/2 टीस्पूनजीरे
  16. 1/2 टीस्पूनमोहरी (राई)
  17. 1/4 टीस्पूनहिंग

कुकिंग सूचना

२०-२५ मिनीटे
  1. 1

    सर्व साहित्य तयार करुन ठेवावे.

  2. 2

    प्रथम एका भांड्यात पाणी घेऊन त्यात कुरमुरे ३-४ मिनीटे भिजवून मग जाळीवर निथळत ठेवावे.

  3. 3

    आता एका कढईत तेल गरम करुन त्यात, फोडणी साहित्य घालून चांगले तडतडू द्यावे आणि मग त्यात कांदा घालून, मऊ होईपर्यंत परतून घ्यावा.नंतर त्यात मिरच्या व शेंगदाणे घालून कुरकुरीत परतून घ्यावे.

  4. 4

    वरील मिश्रणात आता, चणा डाळे, थोडी कोथिंबीर, दाण्याचे कुट, लाल तिखट, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा चांगले परतून घ्यावे. शेवटी गॅस मंद आचेवर करुन त्यात, निथळत ठेवलेले कुरमुरे घालावे.

  5. 5

    कुरमुरे घालून चांगले मिक्स करावे आणि २-३ मिनीटे परतून घ्यावे. नंतर प्लेटमध्ये काढून कोथिंबीर गार्निश करुन डिश सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Vartak Mohite
रोजी
Mumbai and Anand
Explore & Nurture the Creativity within you through Tasty Recipes 💃😋👍😋
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

Similar Recipes