मटर पनीर (matar paneer recipe in marathi)

Manisha Shete - Vispute @manisha1970
#trending recipe
रेस्टॉरंट सारखी चव असणारी ही ग्रेव्ही भाजी चवीला अप्रतिम लागते.
मटर पनीर (matar paneer recipe in marathi)
#trending recipe
रेस्टॉरंट सारखी चव असणारी ही ग्रेव्ही भाजी चवीला अप्रतिम लागते.
कुकिंग सूचना
- 1
मटार सोलून धुवून उकडून घेणे. त्या गरम पाण्यात पनीर तुकडे घालून ठेवणे.
- 2
पॅनमधे १ टेबलस्पून तेल टाकून कांदा लालसर परतणे. टोमॅटो टाकून शिजेपर्यंत परतणे. नंतर त्यात आलं, लसूण,काजू टाकून वाटणे.
- 3
कढईत तेल व बटर टाकून वाटण चांगले परतून घ्यावे. तिखट, गरम मसाला, धणे-जीरे पूड,मीठ टाकून सर्व मसाल्यात परतणे. अर्धा कप पाणी घालून एक उकळी आणावी.
- 4
मटर, पनीर घालून हलवून घ्यावे. वरुन लिंबू रस, कसुरी मेथी व कोथिंबीर घालून वाढावे. ग्रेव्ही घट्टसर ठेवावी. हवे असल्यास ताजी थोडी साय फेटून घालावी. मटर पनीर रेस्टॉरंट सारखी तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15329711












टिप्पण्या