झटपट मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
भाज्या स्वच्छ धुऊन कापून घ्याव्यात. हिरवी मिरची आणि खोबर्याचे वाटण तयार करून घ्यावे. लसणाची पेस्ट तयार करून घ्यावी.
- 2
कुकर मध्ये तेल गरम करून जीरे मोहरी घातल्यानंतर तेजपान आणि खडे मसाले घालावे. आलं-लसणाची पेस्ट आणि कांदा खोबर्याचे वाटण घालावे. वाटण दोन तीन तीन मिनिटे परतल्यानंतर सर्व भाज्या घालाव्यात सर्व भाज्या तेलामध्ये दोन ते तीन मिनिटे परतून घ्यावे. नंतर हळद,तिखट, धने जीरे पावडर,गरम मसाला प्रमाणात मीठ घालून मिक्स करून घ्यावे. भाजी आणि मसाल्यामध्ये दोन ते तीन मिनिटे तांदूळ परतून घ्यावे. तांदूळ परतल्यानंतर तांदळाच्या दुप्पट पाणी घालून कुकरचे झाकण ठेवून तीन सुट्ट्या काढून घ्याव्यात.
- 3
कुकर थंड झाल्यानंतर कुकर मधील भात कोथिंबीर घालून व मिक्स करून घ्यावा. तयार आहे आपला गरमागरम झटपट होणारा मसाले भात.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15339346












टिप्पण्या