नागपंचमी स्पेशल खुसखुशीत गुळाची करंजी (gulachi karanji recipe in marathi)

आईची रेसिपी...तीच्या हातांनी एकदम स्वादिष्ट, खुसखुशीत बनते करंजी.. मी प्रयत्न केला, आई सोबत होती म्हणूनच.. नागपंचमीला हमखास बनवतात..

कुकिंग सूचना
- 1
बारीक रवा, मीठ, गरम तेल, छान एकत्र करून घ्या.
- 2
हाताने मळून घ्या. लागेल तसे कोमट पाणी घालून नरम मळून घ्या.
2 तास झाकून ठेवा.
रवा फुगायला छान वेळ मिळतो. - 3
सारणासाठी 4 वाटी तीळ भाजून घ्या.
तो थंड होऊ द्या.
3 वाटी गुळ घ्या.
मिक्सरमधून बारीक करून घ्या. - 4
2 तासांनंतर, रवा ठोकून ठोकून एकदम नरम करून घ्या.
लहान गोळे करून, पातळ लाटून घ्या.
करंजी चा साचा वापरून, सारण भरुन करंजी पाणी लावून नीट चिटकून घ्या. - 5
तेल गरम करून घ्या.
गॅस मध्यम आचेवर ठेवा.
करंजी तळून घ्या. तपकिरी रंग नकोय.
खुसखुशीत करंजी तयार आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (3)