उपवासाचा वडा चटणी (upwasacha vada chutney recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#tri
#week1
#ट्राय - इंग्रीडीएन्ट्स रेसिपी
#उपवासाचा वडा चटणी
श्रावण महिन्यात बरेच जणांचे उपवास असतात. मस्त खुसखुशीत असा वडा कमी घटक वापरून करता येतो. उपवासमध्ये खाण्यासाठी थोडा वेगळा असा उपवास वडायाची रेसिपी पाहुयात.

उपवासाचा वडा चटणी (upwasacha vada chutney recipe in marathi)

#tri
#week1
#ट्राय - इंग्रीडीएन्ट्स रेसिपी
#उपवासाचा वडा चटणी
श्रावण महिन्यात बरेच जणांचे उपवास असतात. मस्त खुसखुशीत असा वडा कमी घटक वापरून करता येतो. उपवासमध्ये खाण्यासाठी थोडा वेगळा असा उपवास वडायाची रेसिपी पाहुयात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35-40 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपभगर
  2. 1बटाटा
  3. 2-3हिरवी मिरची
  4. आवश्यकतेनुसार पाणी
  5. चवीनुसारमीठ
  6. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

35-40 मिनिट
  1. 1

    प्रथम भगर /वरई तांदूळ स्वच्छ धून घेणे. नंतर ही भगर गरम पाणी घालून छान नेहमी प्रमाणे मऊ शिजवून घेणे. त्यात शिजताना चवीनुसार मीठ घालावे. शिजल्या नंतर ती थंड होण्यासाठी एका खोलगट प्लेट मध्ये काढून घेणे.

  2. 2

    आता या शिजलेल्या भगर मध्ये एक कच्चा बटाटा स्वच्छ धून त्याची साल न काढता खिसणीने खिसुन घेणे. आता त्या मध्ये बारीक चिरून मिरचीचे तुकडे, गरज असेल तर मीठ घालावे कारण शिजताना मीठ घातले होते. आवडत असल्यास कोथिंबीर घालावी. आता हे सगळे मिश्रण छान एकत्र मळून घेणे.

  3. 3

    आता गॅस वर कढई ठेवून त्या मध्ये तळण्यासाठी तेल घालावे. तो पर्यंत एका बाजूला उपवासाची हिरवी चटणी तयार करून घेणे. आता या तयार बॅटर चे छोटे छोटे चपटे वडे थापून मध्ये होल पाडून घेणे. व सगळे वडे थापून प्लेट मध्ये ठेवणे.

  4. 4

    गरम झालेल्या तेलामध्ये हे वडे अलगद सोडावेत. मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घेणे.व प्लेट मध्ये काढून घेणे.अशा प्रकारे सगळे वडे तळून घेणे. (कच्चा बटाटा मुळे वडे खुसखुशीत होतात)

  5. 5

    मस्त खमंग खुसखुशीत उपवासाचा वडा खाण्यासाठी तयार आहे. मस्त गरम गरम वडे चटणी सोबत सर्व्ह करावे. खूप छान होतात. नक्की करून पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

Similar Recipes