मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम डाळी या स्वच्छ धुवून पाच तास भिजू द्या. दही गरम करून घ्या मिक्स डाळींचे मिक्सरला बारीक वाटण करताना दही टाकून बारीक करा. फरमेंट होण्यासाठी सात ते आठ तास हवाबंद जागेवरती ठेवा त्यानंतर बॅटर मध्ये वरून फोडणी करण्यासाठी तेल मोहरी हिंग यांची फोडणी करून बॅटर मध्ये टाका. हिरवी मिरची अद्रक पेस्ट,चवीनुसार मीठ,हळद, हिंग आणि इनो सोडा टाकून बॅटर मिडीयम तयार करून घ्या
- 2
एका कढईमध्ये पाणी आणि स्टॅन्ड ठेवून गरम होण्यासाठी ठेवा तेल लावून प्लेट ग्रीस करून घ्या तयार केलेले बॅटर हे टाका पंधरा मिनिटापर्यंत मिडीयम गॅस वरती होऊ द्या वरून फोडणी टाकण्यासाठी एक लहान कढई गरम करून त्यामध्ये तेल मोहरी हिंग तडतडल्यावर कढीपत्ता तेल टाकून गॅस बंद करून घ्या
- 3
पंधरा मिनिटानंतर ढोकळा हा तयार झाला असेल पूर्णपणे पाच ते सात मिनिटे पर्यंत थंड होऊ द्या थंड झाल्यावर भरून तयार केलेली फोडणी टाकून गार्निश करा
- 4
छान पैकी गरमागरम चटपटीत हेल्दी मिक्स डाळ ढोकळा तयार आहे
- 5
टी टाईम स्नॅक्स मिक्स डाळ ढोकळा तयार आहे
Keywords
Similar Recipes
More Recipes



















टिप्पण्या (9)