डिंक खजुर सुकामेवा लाडू (dink khajur sukhamewa laddu recipe in marathi)

Varsha Ingole Bele @varsha_1966
डिंक खजुर सुकामेवा लाडू (dink khajur sukhamewa laddu recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व सामग्री एकत्र ठेवावी. खोबरे किसून घ्यावे. आता पॅन मध्ये थोडेसे तूप टाकून ते गरम करावे. त्यातच खजूर टाकून किंचित परतून घ्यावे. डिंक तुपात तळून घ्यावा.
- 2
आता त्याच पॅनमध्ये अक्रोड, चारोळी, पिस्ता, किसमिस, थोडे भाजून घ्यावे. त्यातच खोबरे किस ही टाकावा. काजू बदाम जाडसर बारीक करून ते ही तुपात थोडेसे परतून घ्यावे.
- 3
तसेच तळलेला डिंक ही टाकावा. आता तुपात परतून घेतलेली सर्व सामग्री, वेलची सोललेली, फूड प्रोसेसर मध्ये बारीक करून घ्यावी.
- 4
आता लाडूचे मिश्रण तयार आहे. त्याचे पाहिजे त्या आकाराचे लाडू वळून घ्यावेत.
- 5
नंतर एका पॅनमध्ये खसखस टाकून ती किंचित भाजून घ्यावी. आता वळून घेतलेले लाडू, भाजलेल्या खसखस मध्ये घोळवून घ्यावे.
- 6
अशा प्रकारे, खसखस मध्ये, घोळलेले, पौष्टिक आणि स्वादिष्ट, डिंक,खजुर, सुकामेवा लाडू, खाण्यासाठी तयार आहे, हिवाळ्यात..
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15677923
















टिप्पण्या (10)