"चिझी बर्स्ट पिझ्झा"
कुकिंग सूचना
- 1
आधी पाणी साखर आणि यीस्ट याचे मिश्रण बनवून घ्या
- 2
मिश्रण 10 मिनीटांनी फ्रॉदी होईल, त्या नंतर त्यात तेल आणि गव्हाचं पीठ घालून घ्या
- 3
त्यात चवीनुसार मीठ घालून कणिक मऊसूत मळून घ्या, गरज लागली तर कणिक मळताना अजून कोमट पाणी वापरू शकता
- 4
कणिक मळून झाल्यावर त्यावर तेल लावून घ्या आणि झाकून 1 तासभर गरम जागेत ठेवून द्या, 1तासाने कणिक दुप्पट फुलेल
- 5
कणिक मधील हवा काढून घ्या आणि कनिक परत एकदा मळून घ्या
- 6
कणिक लाटून घ्या, लाटताना सोयाबीन किंवा मक्याच्या पिठाचा वापर करा,म्हणजे बेक झाल्यावर क्रस्ट चांगला येतो, एक पोळी लाटून त्यावर फोर्क ने टोच मारून घ्या, आणि पोळी 4 मिनटं 200 डिग्री प्रिहिटेड ओव्हन मध्ये बेक करून घ्या
4 मिनिटांनी पोळी बाहेर काढून त्यावर पिझ्झा सॉस आणि चीझ घालून घ्या
कणकेची दुसरी पोळी लाटून ती चीझ वर
पसरवून घ्या
त्या वर परत एकदा पिझ्झा सॉस लावून घ्या - 7
आणि वरून आपल्या आवडत्या भाज्या घालून त्यावर ऑरेंगानो, चिलीफ्लेक्स आणि भरपूर चीझ घालून घ्या
आणि पिझ्झा बेक करायला ठेवा, ओव्हन किंवा कढई मध्ये बेक करू शकता..
200 ℃ वर 10 ते 15 मिनीटे गोल्डन क्रस्ट येई पर्यंत बेक करून घ्या - 8
आणि कट करून सर्व्ह करा...
"चिझी बर्स्ट पिझ्झा"
Keywords
Similar Recipes
More Recipes




























टिप्पण्या (2)