स्टफ आलू पराठा (Aloo paratha recipe in Marathi)

#CDY
चिल्ड्रन्स ड्रेस स्पेशल रेसिपी म्हणजे लहान मुलांची आवडती रेसिपी करायची...माझं बाळ दोन वर्षाची असलं तरी आत्तापासूनच ती खवय्ये आहे हे मला कळले..
कारण तिला सगळ्या चवीचे चे सगळे पदार्थ चाखून बघायला आवडतं... अर्थातच लहान असल्यामुळे तिच्या खाण्यापिण्याचे बरेच लाडला करावे लागतात पण भातापेक्षा ही तिला पोळीचे प्रकार किंवा पराठ्याचे प्रकार खूप आवडतात आणि त्यातल्या त्यात आलू पराठा हा माझ्या बाळाचा अत्यंत आवडीचा पदार्थ त्यामुळे या निमित्ताने पाहू या स्टफ आलू पराठा कसा करायचा...

कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम चार बटाटे उकडून घ्यावे ते सोलून घ्यावेत. आता मिक्सर मध्ये थोडी कोथिंबीर मिरची आल्याचा तुकडा हे घेऊन मिश्रण एकत्र करावे.
- 2
बटाटे स्मॅश करून घ्यावे आणि त्यामध्ये तयार मसाल्याची पेस्ट घालावी सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावे त्यात थोडे मीठ घालावे हवे असल्यास तिखट जिरेपूड घालू शकता.
- 3
पोळीसाठी मळतो तशी कणीक मळून घ्यावी. त्या कणकेचा एक गोळा घेऊन त्यामध्ये साधारण एक-दीड चमचा तयार बटाट्याचे स्टफिंग भरून घ्यावे. आणि पराठा सर्व बाजूने समान लाटून घ्यावा.
- 4
तव्यावरती दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यावा, तेल वापरू शकता लहान मुलांसाठी करत आहात तर बटर वापरल्यास टेस्ट छान होते. सॉस चटणी किंवा दह्या सोबत सर्व्ह करावा.हेल्दी तर आहेच आणि गरमा गरम खायला छान लागतो...
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)