झणझणीत मटण रस्सा | मटणाचा रस्सा (Mutton Rassa Recipe in Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कढ़ाई गरम झाल्यावर त्यात खसखस, तिळ भाजून घेणे प्लेट मध्ये काढून घेणे आता तेल घालणे त्यात सुखे खोबरे गोल्डन तळून घेणे प्लेट मध्ये काढणे आता कांदा गोल्डन परतून घेणे प्लेट मध्ये काढणे आता आले लसुण तळून घेणे त्यातच कोथिंबीर परतून घ्यावी हे सगळे प्लेट मध्ये गार करायला ठेवणे गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पेस्ट वाटून घ्यावी
- 2
आता कांदे, टोमॅटो, मिरच्या आणि वाटण याची तयारी करावी
- 3
आता काढाईत तेल गरम झाल्यावर त्यात मिरच्या आणि कांदे गोल्डन परतून घ्यावे
- 4
आता टोमॅटो घालावे आणि मऊ परतून घ्यावे आणि वाटलेला मसाला घालावा
- 5
आता हा मसाला चांगला तेल सुटे पर्यंत परतून घ्यावा आणि त्यात हळद, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला, धणे पावडर घालावे आणि मसाला परतून घ्यावा
- 6
आता त्यात स्वच्छ धुतलेले मटणाचे तुकडे घालून सर्व परतून घ्यावे
- 7
आता त्यात पाणी ना घालता मटण 15-20 मिनिटे झाकण लावून बारीक गॅसवर वाफवून घ्यावे
- 8
आता 20 मिनिटानंतर त्यात लागेल तसे गरम पाणी घालावे आणि रस्सा लागेल तसा पाणी घालावे आणि मीठ घालावे सर्व नीट हलवून घ्यावे
- 9
परत झाकण लावून मटण शिजेपर्यंत शिजवावे
- 10
आता मटण रस्सा तयार आहे गरम गरम भाकरी किंवा पोळी आणि भाताबरोबर सर्व्ह करावे
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
















टिप्पण्या (3)