चमचमीत सोयाबीन मसाला (soyabean masala recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
वाटण साठी - प्राथम काढाईत 1 पळी तेल घालून गरम झाल्यावर त्यात खोबरे तुकडे चॉकलेटी तळून घ्यावे करपवु नये आता ते एका प्लेट मध्ये काढावे आता त्यात आले लसुण घालुन परतावे प्लेटमध्ये काढावे आता उभा चिरलेला कांदा गोल्डन तळून घेऊन प्लेटमध्ये काढा आता टोमॅटो आणि कोथिंबीर घालून परतून घेऊन प्लेटमध्ये काढून सर्व गार करून घ्या.आता हे वाटण मिक्सरमध्ये वाटून घ्या
- 2
आता तयारी करून घ्यावी
- 3
प्रथम काढाईत पाणी गरम करून घ्यावे आणि त्यात सोयाबीन चंक्स 15 मिनिटे भिजवून ठेवावीत
- 4
आता दुसर्या काढाईत तेल गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा गोल्डन परतून घ्यावा आणि वाटलेला मसाला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यावा
- 5
आता त्यात कांदा लसुण मसाला, हळद, धणे पावडर, गोडा मसाला घालून परतून घ्यावा आणि भिजवलेले सोयाबीन चंक्स पाण्यातून काढून हातानी पिळून पाणी काढावे आणि मसाल्यात घालावेत
- 6
आता सर्व छान परतून घेऊन त्यात लागेल तसे पाणी घालून रस्सा किंवा मसाला करावा आणि मीठ घालावे
- 7
सर्व परतून काढाईला झाकण लावून बारीक गॅसवर 1/2 तास शिजवून घ्यावे मसाला काढाईला लागू देऊ नये आता चमचमीत सोयाबीन मसला तयार आहे
- 8
आता गरम गरम चमचमीत सोयाबीन मसाला पोळी/भाकरी/नान,भाताबरोबर सर्व्ह करा
- 9
Keywords
Similar Recipes
More Recipes

























टिप्पण्या (5)