सोयाबीन ची भाजी (soybean chi bhaj recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गॅसवर कढई तापत ठेवा त्यामध्ये १ टेबलस्पून तेल टाकून जीरे, मिरे,लवंग,भेंडी विलायची व विलायची टाकून २-३ मिनिटे हलवून घ्या. नंतर त्यात कट केलेला कांदा ब्राऊन रंगावर होईपर्यंत तळून घ्या. आता टमाटे टाकून परत एकदा हलवून घ्या. लसणाच्या पाकळ्या व आल्याचे तुकडे टाकून पुन्हा ५-७ मिनिटे परतून घ्या आणि मसाला थंड होण्याकरता बाजूला ठेवून द्या.
- 2
दुसर्या गॅसवर कढईमध्ये १ ग्लास पाणी टाकून १/२ टेबलस्पून मीठ टाकून सोयाबीन टाकून एक उकळी येऊ द्या.गँस बंद करून सोयाबीन पिळून घ्या.
- 3
गॅसवर कढई तापत ठेवून त्यात तेल टाका. तेल गरम झालं की त्यामध्ये उकडून घेतलेले सोयाबीन टाकून मंद आचेवर तळून घ्या.
- 4
सोयाबीन तळून होत आहे तो पर्यंत थंड झालेला मसाला मिक्सर मधून पाणी न घालता बारीक करून घ्या.
- 5
गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाका. तेल गरम झालं की गॅस मंद करून त्यामध्ये हळद व लाल मिरची पावडर टाकून चांगले हलवून त्यात बारीक करून घेतलेला मसाला टाकून परतून घ्या. नंतर त्यात धने पावडर व चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा परतून त्यात सोयाबीन टाकून चांगले हलवून घ्या व आपल्याला पाहिजे तेवढे पाणी घालून १ उकळी येऊ द्या व गॅस बंद करा.
- 6
भाकरीबरोबर सोयाबीन ची भाजी छान लागते. गरम गरम सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes




टिप्पण्या