ढाबा स्टाइल चिकन करी (chicken curry recipe in marathi)

Poonam Pandav @poonam_1984
ढाबा स्टाइल चिकन करी (chicken curry recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम चिकन स्वच्छ धुवुन त्याला दही, आले-लसूण पेस्ट,लिंबाचा रस आणि सर्व मसाले लावून किमान 1तास मॅरीनेट करावे.
- 2
कढई मध्ये तेल गरम करून त्यात जिरं आणि खडा मसाला परतून घ्यावा. नंतर त्यात कांदा लालसर परतून घ्यावा. नंतर त्यात टोमॅटो मऊसूत परतून घ्यावे. आणि नंतर त्यात मॅरीनेटेड चिकन घालावे. मीठ घालवे. चिकन मसाल्यांमध्ये चांगले परतून घ्यावे.चिकन शिजण्यापुरत पाणी घालून चिकन ला झाकण लावून 15 ते 20 मिनटं मध्यम आचेवर शिजवून घ्यावे.
- 3
चिकन शिजले की त्यावर चिरलेली कोथिंबीर व तळलेला कांदा घालावा. मंद आचेवर चिकन च्या ग्रेव्ही ला 4 ते 5 मिनटं शिजू द्यावे. गरमागरम धाबा स्टाइल चिकन करी चपाती भाकरी किंवा भातासोबत सर्व्ह करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15857303











टिप्पण्या