बटर चिकन (Butter chicken recipe in marathi)
# EB16
#W16
# विंटर स्पेशल रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्यावेत.हळद,तिखट,काश्मिरी लाल तिखट आणि तेल चिकन ला लावून 10-15 मिनिटे ठेवून द्यावे.नंतर घट्ट दही,आलं लसूण पेस्ट आणि मीठ घालून चिकन 7 ते 8 तास मॅरीनेट होउ द्यावे.
- 2
ग्रेव्ही साठी एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा परतुन घ्यावा व त्यात आलं,लसणाच्या पाकळ्या घालाव्या.काजू,मगज बिया, हिरवा वेलदोडा,भिजवलेल्या लाल मिरच्या, चिरलेला टोमॅटो घालावा व परतुन पाणी घालून मिश्रण शिजवून घ्यावे.
- 3
मिश्रण गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे व गाळून घ्यावे.एका पॅन मध्ये बटर घालून हे मिश्रण परतून घ्यावे.गरज पडल्यास पाणी घालावे व त्यात कसूरी मेथी, फ्रेश क्रीम, मीठ व साखर घालून उकळी काढावी. गरम मसाला घालून झाकून ठेवावे.
- 4
मॅरीनेटेड चिकन एका पॅन मध्ये बटर घालून किंवा barbecue वर ग्रील करून घ्यावे.
- 5
ग्रील्ड चिकन चे तुकडे करून ग्रेव्ही मध्ये घालावे व 5-7 मिनिटे शिजवावे. बटर रोटी बरोबर सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes






टिप्पण्या