कोळंबी मसाला (Kolambi masala recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कांदे,टोमॅटो बारीक चिरून घ्यावे. बटाट्याच्या पातळ फोडी कराव्यात. कोळंबीला हळद व मीठ लावून ठेवावे.
- 2
कढई मध्ये तेल गरम करून त्यात कांदा गुलाबी रंगावर परतावा. गॅस मिडीयम स्लो असावा. त्यातआलं लसूण पेस्ट,बारीक चिरलेली कोथिंबीर व बारीक चिरलेला टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परतावे.
- 3
आता त्यात बटाट्याच्या फोडी घालून मिक्स करावे व त्यात थोडे पाणी घालून बटाटे शिजवावे. बटाटे शिजले की त्यात मालवणी मसाला,कोळंबी व चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे व एक वाफ काढावी.कोळंबी लगेच शिजते.कोळंबी शिजली की कोळंबी मसाला तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16061479











टिप्पण्या