मालवणी सुरमई मसाला फ्राय (Malvani surmai masala fry recipe in marathi)

चमचमीत मालवणी मसाल्यातील ही सुरमई फ्राय चवीला फार भन्नाट लागते..😋😋
सोबतीला तांदळाची गरमागरम भाकरी , वाफाळता भात, सुरमईचा सार, सोलकढी असली की जेवणाची चव आणखी वाढते.
चला तर मग पाहूयात चमचमीत मालवणी सुरमई फ्राय..😋

कुकिंग सूचना
- 1
सुरमईला कोकम आगळ लावून घ्या.
- 2
नंतर त्यात आलं लसूण कोथिंबीर मिरचीची पेस्ट,लाल तिखट,मालवणी मसाला, हळद, मीठ चवीनुसार घालून छान मिक्स करा.
- 3
एका प्लेटमधे रवा, तांदळाचं पीठ थोडं लाल तिखट,हळद,मसाला,मीठ घालून छान एकत्र करा. व मसाला लावलेली सुरमई यामधे घोळवून घ्या.
- 4
पॅनमधे तेल गरम करून त्यात ही सुरमई छान दोन्ही बाजूंनी क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्या.
- 5
खायला तयार आहे चमचमीत मालवणी सुरमई फ्राय.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (3)