ढाबा स्टाईल चिकन (Dhaba Style Chicken Recipe In Marathi)
ढाबा स्टाईल चिकन (Dhaba Style Chicken Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कुकरमध्ये २ मोठा चमचा तूप घालून ते गरम करून घ्यावे. आता त्यात १ चमचा जीर घालून ते छान फुलून द्यावे. आता त्यात ४ काळी मिरी, १ दालचिनी चा तूकडा, २ वेलची, १ तमालपत्र, घालावे.आता त्यात ४ कांदे बारीक कापलेले घालावे. कांदा छान सोनेरी रंगात आला की, मग त्यात टॕमेटोची प्यूरी घालावी. आता ५ मिनिटे ते वाफेस ठेवावे.
- 2
आता चिकन ला मसाला लावून तो २ तास फ्रीज मध्ये ठेवा. ( चिकन मॕगनेट करण्यासाठी - आधी चिकन स्वच्छ धुऊन साफ करून घ्या. नंतर त्यात १ चमचा अल+ लहसूणची पेस्ट, १ चमचा मोठा किचन किंग मसाला, लाल तिखट १ छोटा चमचा, १/२ चमचा गरम मसाला, १ चमचा मीठ, १/२ चमचा हळद, १कप दही घालून ते छान एकत्र करून फ्रीजमध्ये २ तास ठेवून द्यावे. त्यामुळे चिकनला लावलेला मसाला छान मुरला जातो.
- 3
आता वाफेस ठेवलेले टॕमेटो छान मऊ झाले की, त्यात ते मॕगनेट केलेले चिकन त्यात घालून ते छान एकत्र करून घ्यावे. आता त्यात १/२ कप पाणी घालून कुकरचे झाकण बंद करून ५ शिट्ट्या काढून घ्याव्यात.
- 4
अशा प्रकारे ढाबा स्टाईल चिकन तयार आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- साबुदाणा थालीपीठ (Sabudana Thalipeeth Recipe In Marathi)
- उरलेल्या भाकरीचे तुकडे/चिवडा (Left Over Bhakri Chivda Recipe In Marathi)
- बटाटा शेंगदाण्याची आमटी (Batata Shengdanyachi Amti Recipe In Marathi)
- उपवासाचा वरीचा केशरी भात (Upwasacha Varicha Kesari Bhat Recipe In Marathi)
- उपवासाची लालतिखटातली साबुदाण्याची खिचडी (Laltikhat Sabudana Khichdi Recipe In Marathi)
- उपवासाची लालतिखटातली साबुदाण्याची खिचडी (Laltikhat Sabudana Khichdi Recipe In Marathi)
- दुधीच्या सालाची ओली चटणी (Dudhichya Salichi Oli Chutney Recipe In Marathi)
- उरलेल्या भाकरीचे तुकडे/चिवडा (Left Over Bhakri Chivda Recipe In Marathi)
- उपवासाचा वरीचा केशरी भात (Upwasacha Varicha Kesari Bhat Recipe In Marathi)

टिप्पण्या