बटाटा शेंगदाण्याची आमटी (Batata Shengdanyachi Amti Recipe In Marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#UVR #उपवासाच्या रेसिपीज # वरई तांदळाच्या भातासोबत किंवा साबुदाणा खिचडी बरोबर खाण्यासाठी बटाटा शेंगदाण्याची आमटी खुप टेस्टी लागते. चला तर रेसिपी बघुया

बटाटा शेंगदाण्याची आमटी (Batata Shengdanyachi Amti Recipe In Marathi)

#UVR #उपवासाच्या रेसिपीज # वरई तांदळाच्या भातासोबत किंवा साबुदाणा खिचडी बरोबर खाण्यासाठी बटाटा शेंगदाण्याची आमटी खुप टेस्टी लागते. चला तर रेसिपी बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
३-४ जणांसाठी
  1. 2-3उकडलेल्या बटाट्यांच्या फोडी
  2. ५० ग्रॅम भाजलेले शेंगदाणे
  3. २० ग्रॅम ओले खोबरे
  4. 3-4मिरच्या
  5. 1 टिस्पुनजीरे
  6. 1 इंचआले
  7. 1-2 टेबलस्पुनसाजुक तुप
  8. 1-2कोकम तुकडे
  9. चविनुसारमीठ
  10. चविनुसारसाखर

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम भाजलेले शेंगदाणे, ओले खोबरे, मिरच्या, आले, जीरे ह्याची पेस्ट करून ठेवा तसेच आमटी साठी लागणारे साहित्य काढुन ठेवा

  2. 2

    पातेल्यात साजुक तुप गरम करून त्यात जीरे परतुन लगेच बटाट्याच्या फोडी टाकुन परतुन घ्या थोडा गोल्डन कलर येई पर्यत

  3. 3

    नंतर त्यात शेंगदाण्याची पेस्ट, मीठ, साखर, कोकम टाकुन परता व आवश्यकते नुसार गरमपाणी मिक्स करा १-२ उकळी काढुन मंद गॅस वर ५ मिनिटे शिजवा आपली बटाटा शेंगदाण्याची आमटी रेडी

  4. 4

    बटाटा शेंगदाण्याची गरम गरम आमटी बाऊलमध्ये सर्व्ह करा ही आमटी वरईच्या भातासोबत किंवा साबुदाणा खिचडी बरोबर खाता येईल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

Top Search in

टिप्पण्या

Similar Recipes