दाणेदार बेसन लाडू (Besan Ladoo Recipe In Marathi)

#SSR
पीठी साखर न वापरता त्या ऐवजी साखरेचा बुरा (तगार) वापरुन केलेले हे लाडू छान दाणेदार होतात. श्रावण शुक्रवारी जरा जिवांतिका पूजन करतात त्यासाठी नैवद्या साठी चणे फुटाणे, चण्याचे पदार्थ असतात. नैवद्य साठी झटपट होणारे लाडू.

कुकिंग सूचना
- 1
एका नॉनस्टिक पॅनमध्ये साखर घालून त्यात १/४
कप पाणी घालावे आणि मध्यम आचेवर सतत ढवळत राहावे.५-६ मिनिटात साखर घट्ट होईल, त्याचा रवाळ चुरा होइल, त्यालाच तगार म्हणतात. गॅस बंद करावा. साखरेचे गोळे झाले असतील तर ते छान, हाताने फोडून किँवा मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे. व चाळणीतून चाळून घ्यावे.त्यातच वेलची पूड घालावी - 2
आता कढई मध्ये तुप व बेसन घालावें, मंद आचेवर सतत परतत बेसन छान लालसर रंग येई पर्यंत भाजावे, आता त्यावर पाण्याच्या हबका मारावा. म्हणजे बेसन छान फुलत व लाडू दाणेदार होतात. थोडे परतून गॅस बंद करावा व बेसन थोडे थंड होऊ द्यावे. एकदम थंड होऊ देऊ नये
- 3
नंतर त्यात साखरेचा तयार तगार घालावे व छान मिसळून द्यावे, आवडीप्रमाणे ड्राय फ्रुट घालावे व लाडू वळावेत.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- शाही व्हेज पुलाव (Shahi Veg Pulao Recipe In Marathi)
- करवंदाचे गोड लोणचे (Karvandache God Lonche Recipe In Marathi)
- मूगदाळ व चना डाळ वडे (Moongdal Chanadal Vade Recipe In Marathi)
- मूग डाळ टाकून पत्ता कोबीची भाजी (Moong Dal Patta Kobichi Bhaji Recipe In Marathi)
- बेसन मसाला स्टफ मिरची (Besan Masala Stuff Mirchi Recipe In Marathi)

टिप्पण्या (4)