ओनियन व्हाइट ग्रेव्ही (Onion White Gravy Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
कांदा गरम पाण्यात 5 मिनिटे उकळून घ्या. चाळणीने चाळून घेऊन त्यावर साधे पाणी घालून धूवून घ्या. असे केल्याने कांद्याचा स्मेल ग्रेवित येणार नाही.
- 2
आता काढून ठेवलेले साहित्य (काजू, मगज बी, खसखस, हिरवी विलायची) अर्धा ग्लास पाणी घालून कांद्यासोबत 5 मिनिटे शिजवून घ्या.
- 3
शिजलेले मिश्रण थंड झाल्यावर मिक्सर मधून छान पेस्ट करून घ्या. आता एका कढईत बटर गरम करून त्यात हिरवी मिरची, मोठी विलयची, तेजपान आणि आले लसुण पेस्ट 1 मिनिट परतून घ्या. व बारीक केलेली पेस्ट 2 ते 3 मिनिट परतून घ्या.
- 4
पेस्ट सारखी ढवळत रहा. त्यात अर्धा ग्लास गरम पाणी आणि चवीनुसार मीठ घालून 4 ते 5 मिनिट शिजवून घ्या.
- 5
ग्रेव्ही थोडी घट्ट झाली की गॅस बंद करा. आपली ओनियन व्हाइट ग्रेव्ही तयार आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16493938















टिप्पण्या