शाही एग बिर्याणी (Shahi Egg Biryani Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

अतिशय चमचमीत व टेस्टी पौष्टिक अशी ही बिर्याणी आहे

शाही एग बिर्याणी (Shahi Egg Biryani Recipe In Marathi)

अतिशय चमचमीत व टेस्टी पौष्टिक अशी ही बिर्याणी आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
3 सर्व्हिंग्ज
  1. 3 वाटीबासमती तांदूळ धुऊन ठेवलेले
  2. 2टोमॅटो,दीड इंच आलं,आठ लसणाच्या पाकळ्या बारीक वाटलेल्या
  3. मोठे चार कांदे उभे चिरलेले व त्यातले थोडेसे ठेवून बाकी तळून ठेवलेले
  4. 1/4 वाटीकाजू, पाव वाटी बदाम, पाव वाटी किसमिस थोड्याशा तेलात तळलेले
  5. 1/2 वाटीकोथिंबीर,अर्धी वाटी पुदिना धुऊन बारीक कापलेला
  6. 2चक्रीफुल दोन इंच दालचिनी, चार मिरी, दोन वेलची
  7. 1मोठी वाटी घट्ट दही
  8. 6अंडी शिजून साल काढून त्याला चिरा पाडून थोड्याशा तेलामध्ये हळद तिखट मीठ टाकून फ्राय केलेली
  9. मीठ चवीनुसार, थोडीशी साखर
  10. 1 टेबलस्पूनतेल, एक टेबलस्पून बटर
  11. 1 मोठा चमचाशाही बिर्याणी मसाला
  12. 1 मोठा चमचाएग मसाला
  13. 1/4 चमचाहळद, अर्धा चमचा तिखट
  14. ते पाच चमचे साजूक तूप

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    प्रथम एका पॅनमध्ये थोडसं तेल व थोडसं बटर घालून त्यामध्ये सगळे खडे मसाले घालावे व न टाळता बाजूला ठेवलेले कांदा घालून लालसर परतावा व तांदळाच्या दुपटीच्या थोडं कमी पाणी घालावं चवीनुसार मीठ घालावं व पाणी उकळू द्यावे व त्यात भिजवलेले तांदूळ घालून भात शिजवून घ्यावा व तो थंड करत मोकळा करून ठेवावा

  2. 2

    परत एका पॅनमध्ये बटर व तेल घालून ते गरम झाले की टोमॅटोचं वाटण घालावं व छान परतावं त्यामध्ये एग करी मसाला घालावा हळद तिखट घालावी व दही फेटून घालावं व सतत ढवळत राहावं म्हणजे दही फाटत नाही मग त्यामध्ये शाही बिर्याणी मसाला घालून तेल सुटेपर्यंत मंद गॅसवर परतत छान तेल सुटू द्यावं मग त्यामध्ये मीठ साखर घालून एकजीव करावं व फ्राय केलेली अंडी त्यामध्ये घालावी

  3. 3

    आता एका मातीच्या भांड्यामध्ये तळाला शिजलेला भात घालावा त्याच्यावर तळलेल्या कांदा ड्राय फ्रुट्स व कोथिंबीर पुदिनाचा लेयर लावावा व त्याच्यावर एक तरी घालावी परत हात घालावा त्यावर उरलेली करी कांदा ड्रायफ्रूट्स कोथिंबीर पुदिनाचा लेयर लावावा वर चार ते पाच चमचे साजूक तूप घालावे झाकण ठेवून मंद गॅसवर हे मिश्रण दहा मिनिटे ठेवावे त्याने त्याला दम इफेक्ट येतो

  4. 4

    एक करी मसाला व बिर्याणी मसाला मध्ये तिखट असल्याने आपण येथे तिखट कमी वापरले दहा मिनिटांनी गॅस बंद करावा व झाकण काढून त्यावर उरलेला कांदा कोथिंबीर ड्रायफ्रूट्स घालून गरम कांद्याच्या रायत्याबरोबर बिर्याणी खावी अतिशय टेस्टी व सुंदर अशी चमचमीत बिर्याणी तयार होते भरपूर ड्रायफ्रूट्स कांदा घातल्याने याला शाही चव येते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes