काला जामुन (Kala Jamun Recipe In Marathi)

#ChooseToCook
नमस्कार सर्वाना बऱ्याच दिवसांनी रेसिपी शेयर करत आहे,खरं तर जागतिक फूड डे आहे व आपली रेसिपी नाही हे काही बरं नाही वाटले म्हणून आज माझी आवडीच्या गुलाबजाम चा एक प्रकार काला जामुन ही रेसिपी मी शेयर करत आहे.
मला गुलाबजाम खूप आवडतात लहानपणापासून माझ्या वाढदिवसाला माझी आई किमान 100 गुलाबजाम घरी बनवायची ,माझे आईचे हातचे गुलाबजाम सारखे गुलाबजाम मी कुठेच दुसरीकडे खाल्लेले नाहीत,तिच्या नंतर मी स्वतः गुलाबजाम घरी बनवते.माझ्या स्वयंपाक घरातील माझी जेवण बनवायची प्रेरणा माझी आई आहे ,तिच्यामुळे नवनवीन पदार्थ घरीच बनवून खाणे व घरातील सर्वाना खाऊ घालणे मी शिकले.तर मग पाहुयात काला जामुन पाककृती....

कुकिंग सूचना
- 1
प्रथम खवा व मैदा एकत्रित घेऊन त्यात सोडा घालून कणिक छान मळून घ्या,मग त्यातला 1/3 कणीक बाजुला काढून त्यात काजू/बदाम/पिस्ता चे काप व केशर काड्या 2 चमचे दुधात घालुन त्यात मिसळून ते कणीक गोळा मळून घ्या,केशर मुळे त्या कणकेला केशरी रंग येईल
- 2
मग साध्या कणकेचे छोटे-छोटे गोळे बनवून घ्या एक गोळा हातात घेऊन त्याची चपटी पारी बनवून रंगीत कणकेच्या गोळ्यातील छोटा गोळा त्यावर ठेवून स्टफिग भरून गोळा पूर्ण बंद करून घेवून त्याला लंब गोल आकार देऊन घ्या,अश्याप्रकारे सर्व गुलाबजाम बनवून घ्या,मग एक भांड्यात साखर घेऊन साखर बुडेल इतकेच पाणी घालून घ्या व ते गॅसवर गरम करायला ठेवा,साखर विरघळून त्याला उकळी येवून चिकटपणा आला की गॅस बंद करा मग त्यात वेलचीपूड घाला व हलवा मग तयार झाला आपला गुलाबजाम साठी साखरेचा पाक
- 3
गॅसवर कढई ठेवून त्यात तूप/तेल गरम झाले की त्यात आपण बनवलेले गुलाबजाम खरपूस तळून घ्या,व मग तळलेले गुलाबजाम पाकात सोडा व त्यात साखरेचा पाक मुरू द्या,मग तयार झाले आपले काला जामुन.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या