तुरीच्या दाण्याची आमटी (Turichya Danyachi Amti Recipe In Marathi)

#KGR
साधारण नोव्हेंबर महिन्यांपासून थंडवा सुरू होतो. आणी हिवाळी नवनवीन भाज्या यायला सुरुवात होते. हिवाळ्यातील भाज्यानां चवही तेवढीच छान असते. या सिझन मधली पहिली तुरीच्या दाण्याची आमटी खुप छान झाली.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम तुरीचे दाणे स्वच्छ धुऊन घेतले. कांदा टोमॅटो, कोथींबीर कट करून घेतली.
- 2
गॅसवर कढई ठेवून किंचित तेल घालून दाणे थोडे परतुन घेतले.
- 3
परतलेले दाणे थोडे थंड झाल्यावर मिक्सर च्या पाॅट मध्ये टाकले. त्यात हिरवी मिरची, लसुन पाकळी,,टोमॅटो, कोथींबीर घालून मिक्सर मधून थोड जाडसर बारीक केले.
- 4
मिक्सर मधुन काढुन तयार झाले. कढई गॅसवर ठेवून तेल गरम केले. जिर, मोहरी तडतडली. कांदा घातला तिखट मीठ जिन्नस घालून मिक्स केले.
- 5
आता दाण्याचे मिश्रण घालून थोड परतुन घेतल. थोड पाणी गरम केल.
- 6
तयार मिश्रणात आवश्यकते नुसार पाणी घातल. उकळुन घेतल.
- 7
आता तुरीच्या दाण्याची आमटी तयार झाली. सर्व्हिंग वाटी मध्ये काढली. मिक्स धान्यांच्या भाकरी सोबत खुप छान लागते.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या