हिरव्या पावट्याचा रस्सा (Hirva Pavata Rassa Recipe In Marathi)

Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
आता थंडीच्या दिवसात भाज्या छान येतात. हिरवा पावटा त्यालाच एक. खूप छान लागतो भाकरी सोबत. चला मग करूया.
हिरव्या पावट्याचा रस्सा (Hirva Pavata Rassa Recipe In Marathi)
आता थंडीच्या दिवसात भाज्या छान येतात. हिरवा पावटा त्यालाच एक. खूप छान लागतो भाकरी सोबत. चला मग करूया.
कुकिंग सूचना
- 1
शेंगा सोलून दाणे काढून धुऊन घ्यावेत. कांदा, टोमॅटो,बारीक चिरून घ्यावेत. बटाटा सोलून फोडी कराव्यात.
- 2
कुकर मधे तेल तापल्यावर मोहरी तडतडल्यावर कांदा घालून परतून घ्यावा. नंतर हिंग घालावे. टोमॅटो टाकून परतून घ्यावेत.
- 3
आता त्यामधे हळद, लाल तिखट, धणेपूड टाकून छान मिक्स करावेत. थोडस पाणी टाकावेत म्हणजे मसाले लागणार नाहीत.
- 4
टोमॅटो मऊ झाल्यावर त्यात पावटा टाकून छान मिक्स करावेत. मीठ घालावे.
- 5
आवश्यकतेनुसार पाणी घालून 3 शिट्टी काढून गॅस बंद करावा.
- 6
कुकर थंड झाल्यावर गरमागरम भाकरी सोबत खाण्यास द्यावेत.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16622955

टिप्पण्या