दम आलू (Dum Aloo Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम बटाटे 2 सीट्टया येईपर्यंत शिजवून घ्या. थंड झाल्यावर सोलुन घ्या.
- 2
एका भांड्यात गरम पाणी करून त्यात कांदा, खसखस, कर्नफुल, मोठी विलायची, मगाज बी, असे एकूण सगळे मसाले 7 ते 8 मिनिट शिजवून घ्या.
- 3
सर्व मसाले उकळल्यावर थंड झाल्यावर मिक्सर मधून बारीक करून घ्या. सोबत एक टोमॅटो ची पेस्ट करून घ्या.
- 4
आता कढईत तेल गरम करून जीरे मोहरी तडतडल्यावर आले लसुण पेस्ट घालून मिक्स करा. मिक्सर मधून बारीक केलेली मसाल्याची पेस्ट घालून 4 ते 5 मिनिट शिजवून घ्या. आता त्यात तिखट, हळद, कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या. टोमॅटो पेस्ट घालून मिक्स करून घ्या. तेल सुटे पर्यंत परतून घ्या.
- 5
आता सोलुन ठेवलेले बटाटे घालून एक वाफ आणावी. त्यात गरम पाणी घालून 2 ते 3 उकळ्या फुटू द्या. शेवटी गरम मसाला आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या. आपली दम आलू ची भाजी तयार आहे.गरम चपात्या सोबत दम आलू ची भाजी सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes













टिप्पण्या