सोलेभात अर्थात तुरीचे दाणे घालून केलेला भात..(Toori Danyacha Bhat Recipe In Marathi)

#DR2 हिवाळ्याच्या दिवसात रात्रीच्या जेवणाच्या वेळेस काय करावे हा प्रश्न पडल्यास वन पॉट मील, असा दाणे भात उत्तम पर्याय आहे. यासाठी ओले तुरीचे दाणे टाकून भात केला आहे. चविष्ट असा दाणेदार कढी, ताक किंवा दह्याच्या कोशिंबीर सोबत छान लागतो.

कुकिंग सूचना
- 1
सर्वसामग्री एकत्र ठिकाणी ठेवावी. कांदा मिरची, गाजर चिरून घ्यावी. तांदूळ धुऊन दहा मिनिटं भिजत ठेवावे.
- 2
आता गॅसवर एक मोठी कढई ठेवावे. त्यात तूप टाकून ते गरम करावे. त्यानंतर त्यात जीरे मोहरी टाकावे. तेज पान, दालचिनी, हिरवी विलायची मिरे टाकून परतून घ्यावे. त्याचप्रमाणे हिरवी मिरची टाकावी.
- 3
नंतर त्यात कांदा टाकून किंचित परतून घ्यावे. त्याचप्रमाणे काजूही टाका. आता त्यात चिरलेले गाजर टाकावे. त्याचप्रमाणे हिरवे तुरीचे दाणे टाकावे.
- 4
चांगले मिक्स करून घेतल्यानंतर आता त्यात हळद आणि बिर्याणी मसाला टाकावा. आणि दोन मिनिट चांगले परतून घ्यावे.
- 5
नंतर त्यात पाण्यातून काढलेले तांदूळ टाकून तीन ते चार मिनिट चांगले परतून घ्यावे. तोपर्यंत एका बाजूला गॅसवर पाणी गरम करण्यास ठेवावे.
- 6
चांगले परतून घेतल्यानंतर त्यात गरम पाणी टाकावे. चवीनुसार मीठ टाकावे.
- 7
झाकण ठेवून तीन ते चार मिनिट मंद आचेवर शिजू द्यावे. नंतर एकदा परतून घ्यावे आणि पुन्हा चार ते पाच मिनिट शिजू द्यावे. भात शिजल्याची खात्री पटल्यानंतर गॅस बंद करावा आणि वरून कोथिंबीर टाकावी.
- 8
असा हा गरमागरम स्वादिष्ट दाणे भात, कढी ताक किंवा कोशिंबिरी सोबत, वरून खोबरे किस घालून सर्व्ह करावा.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या