फुलकोबिचे पराठे (Fulkobi Paratha Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम गव्हाच्या पिठात चवीनुसार मीठ घालून पाण्याने मळवून घेतले आणि 10 मिनिटांसाठी नॅपकिन झाकून बाजुला ठेवले.
- 2
आता फुलकोबी स्वच्छ धुवून घेतली आणि किसणीने किसून घेतली. एका रुमालात किसलेली कोबी ठेवून पिळून घेतली म्हणजे त्यात पाण्याचे प्रमाण अजिबात असणार नाही.
- 3
आता फुलकोबी च्या किसमध्ये तिखट, हळद, चवीनुसार मीठ, आमचूर पावडर, चिमुटभर हिंग, तीळ आणि ओवा आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या. आपले फुलकोबी चे सारण तयार आहे.
- 4
आता कणीक पुन्हा एक वेळ मळवून घेऊन मऊ करून घ्या. एक गोळा तयार करून छोटी पाती लाटून घ्या. त्यात सारण भरून पाती बंद करून घ्या.
- 5
हलक्या हाताने लाटून घ्या आणि गरम तव्यावर दोन्ही बाजूला तेल लावून शेकुन घ्या.
- 6
आपले फुलकोबी चे पराठे तयार आहे. सॉस किंवा शेजवान चटणी सोबत सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- मटार बटाटा चीज पराठा (Matar Batata Cheese Paratha Recipe In Marathi)
- बटाटा मटार चिझ पराठे (Batata Matar Cheese Parathe Recipe In Marathi)
- पंजाबी वेजिटेबल- मॅगी-पास्ता (Punjabi Vegetable Maggi Pasta Recipe In Marathi)
- "मटार, बटाटा पोहे" (Matar Batata Pohe Recipe In Marathi)
- मटार पनीर लच्छा पराठा (Matar Paneer Laccha Paratha Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16765730



















टिप्पण्या