डिलीशियस कॉर्न पालक ऑ गरेटिन (Corn Palak Au Gratin Recipe In Marathi)

#BR2 लहान मुलानं भाज्या आवडत नाहीत . काय करावे असा प्रश्न पडतो . पालेभाज्या खाण्यास नाही म्हणतात . अश्या वेळेस काहीतर हटके करुन दिल्यास आवडीने खातात . मी येथे कॉर्न पालक ऑगरेटीन बनवले . खूपच टेस्टी yummy लागते . चला तर पाहूयात कशी तयार करायची …

कुकिंग सूचना
- 1
प्रथम पालक स्वच्छ धुवून निथलत ठेवा. नंतर बारीक चिरुन घ्या.
- 2
गॅसवर एका भांड्यात 1 वाटी पाणी टाका. पाणी बॉईल झाल्यावर चिरलेला पालक टाकून 3 - 4 मिनिटे ठेवा. नंतर गाळून घ्या. व ते पाणी तसेच बाजूला ठेवा.
- 3
स्वीटकॉर्न मध्ये 2 - 3 टेबलस्पून पाणी टाकून microwave ला प्रथम 2 मिनिटे ठेवा. नंतर पुन्हा 2 मिनिटे ठेवून स्टीम करा. व गाळून घ्या.
- 4
व्हाइट सॉस - गॅसवर एका कढईत अमूल बटर टाकून त्यात आले मिरचीची पेस्ट टाका. परतून त्यात मैदा टाका. लालसर न होवू देता परतून घ्या. नंतर त्यात दूध टाकून सतत ढवळत रहा. त्यानंतर त्यात चवीपुरते मीठ,ब्लांच केलेला पालक व कॉर्न मिक्स करा.
- 5
Microvave कन्व्हेंक्शन मोड मध्ये 180° वर preheat करा. तयार मिश्रण एका काचेच्या बाउल मधे घ्या. त्यावर चीझ किसून मिरपुड भूरभूरा. तयार बाउल माइक्रोवेव मध्ये ठेवा. साधारण 20 मिनिटे लागतात. वरील चीझ लालसर होई पर्यंत ठेवा. अतिशय टेस्टी व yummy लागते.
- 6
लहान मुले व मोठे आवडीने खातात. तुम्हीही नक्की करुन पहा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (6)